nagpur vehicle 
विदर्भ

संचारबंदीत जप्त झालेली तुमची दुचाकी कधी मिळणार? जाणून घ्या...

सकाळवृत्तसेवा

नागपूर : संचारबंदी असतानाही अनेक रिकामटेकडे युवक "थ्रील' म्हणून विनाकारण दुचाकी घेऊन बाहेर फिरायला निघत आहेत. सुरूवातील "दंड्यांचा' वापर करणाऱ्या पोलिसांनी थेट वाहने जप्त करण्यास सुरूवात केली. दीड महिन्यात जवळपास 7 हजारांपेक्षा जास्त वाहने पोलिस ठाण्यात जप्त असल्याची माहिती समोर आली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रारंभी कोरोना आणि पोलिसांच्या लाठीची भीती असल्यामुळे संचारबंदीचे पालन होत होते. मात्र, आठच दिवसांत पोलिसांविरोधात सोशल मिडियावर रोष व्यक्‍त झाल्यामुळे पोलिसांनी आपला हात आवरता घेतला. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच रस्त्यावर गर्दी वाढायला लागली होती. अनेक रिकामटेकड्यांनी दुचाकी काढून विनाकारण फिरणे सुरू केले होते. त्यावर उपाय म्हणून पोलिस विभागाने थेट दुचाकी जप्त करण्याची मोहिम सुरू केली. योग्य कारण न मिळाल्यास रस्त्यावर फिरणाऱ्यांची वाहने ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात जप्त करण्याची धडक कारवाई सुरू केल्यामुळे थोडाफार का होईना रस्त्यावरील गर्दीवर परिणाम झाला. वाहतूक पोलिस रोज जवळपास 200 पेक्षा जास्त वाहने जप्त करीत होते. पोलिसांची कारवाईची स्पीड पाहता आतापर्यंत शहरातील सर्वच पोलिस ठाण्यात जप्त वाहनांची संख्या काही हजारांत गेली आहे. 

लॉकडाऊन के बाद
विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांचे वाहन लॉकडाऊन संपल्यानंतरच परत करण्यात येणार आहे. वाहन जप्त करण्याच्या उपक्रमाची सुरूवात एमआयडीसीचे ठाणेदार हेमंत खराबे यांनी केली. तसेच प्रकरणे तातडीने न्यायालयात पाठविले होते. 

- एका चुकीमुळे नातेवाईकांना सहा दिवस कराव लागली अंत्यसंस्कारासाठी प्रतीक्षा

अडीच कोटी रूपये दंड 
गेल्या जानेवारी ते 1 मे पर्यंत 1 लाख 67 हजार 437 वाहनांवर वाहतूक शाखेने कारवाई केली. या कारवाईतून दंडापोटी 2 कोटी 55 लाख 62 हजार 800 रूपये दंड वसूल करण्यात येणार आहे. यामध्ये हेल्मेट पासून ते पार्किंगपर्यंतच्या चालानचा समावेश आहे. 

संचारबंदी अजुनही सुरू आहे. कुणीही विनाकारण वाहनांसह घराबाहेर पडू नये. अत्यावश्‍यक काम असल्यास संबंधित विभागाची परवानगी घेऊन बाहेर पडावे. अन्यथ पोलिस विभागातर्फे चालकावर कारवाईसह वाहन जप्त करण्यात येईल. 
- विक्रम साळी, पोलिस उपायुक्‍त, वाहतूक शाखा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

निवडणूक आयोगाविरोधात 'इंडिया आघाडी'चा मोर्चा; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा आकाशवाणी परिसरात ठिय्या, दिल्लीत नेमकं काय घडतंय?

Devendra Fadnavis on Gokul Election : गोकुळ दूध संघाची निवडणूक बिनविरोध होणार का?; दस्तुर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेलक्या शब्दात केला खुलासा...

Pune Crime : पुणे हादरलं ! संपत्तीच्या वादातून ८३ वर्षांच्या आजोबाने नातवाला गोळी झाडून संपवलं, कुटुंबाने अपघात असल्याचं भासवलं

Marathi News Live Updates: नवी मुंबई विमानतळावरून पुणे, मुंबईसह विविध शहरांसाठी वाहतूक सुविधा वाढणार; सात ऑक्टोबरपासून इलेक्ट्रिक बससेवा सुरू

आधी भुताची कथा मग २: ३० वाजता खिडकीबाहेर लावलं ते गाणं... कोकणात शर्वरीसोबत जयचा प्रॅन्क, ती इतकी घाबरली की...

SCROLL FOR NEXT