liquor shop open in akola.jpg 
विदर्भ

Breaking : तळीराम झिंगाट, विदर्भातील या जिल्ह्यात आजपासून मद्यविक्रीला सुरुवात

सकाळ वृत्तसेवा

अकोला : अगदी दीड महिन्यापासून बंद असलेली मद्य विक्री आता बुधवारपासून सुरू होणार आहे मात्र, हे मद्यविक्री केवळ ग्रामीण भागातच होणार असून, शहरात मद्य विक्रीला टाळे बंदच असणार आहे. असे असले तरी मात्र, येत्या दोन दिवसात याबाबतही निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

दोन दिवसापूर्वी शासनाने मद्य विक्रीला कंटेनमेंट झोन वगळता परवानगी दिली होती मात्र, अकोला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी संपूर्ण जिल्ह्यात दोन दिवस बंद राहणार असल्याचे घोषित केले होते. आता या दोन दिवसानंतर बुधवारपासून महानगरपालिका क्षेत्र वगळता संपूर्ण जिल्ह्यात मद्य विक्री सुरू होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक स्नेहा सराफ यांनी दिली आहे.

ग्रामीण भागात उघडणाऱ्या दारू दुकानांची संख्या
देशी दारूची दुकाने - 53
वाईन शॉप - 5
बिअर शॉपी - 26

प्रत्येकाचे होणार थर्मल स्कॅनिंग
दारू विक्रीच्या दुकानाला परवानगी जरी दिली असली तरी या दारू दुकानावर येणाऱ्या ग्राहकांची थर्मल स्कॅनिंग होणार आहे. ज्यांना सर्दी, ताप, खोकला आहे अशांना दारूविक्री केली जाणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. तर वाईन शॉप वर दारू विक्री करताना विक्रेत्याला आणि ग्राहकाला सोशल डिस्टन्सचे पालन करून मास्क लावून खरेदी-विक्री करावी लागणार आहे.

गर्दी कराल तर होतील दुकाने बंद
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहा सराफ यांनी दिलेल्या माहितीनुसार जर ग्राहकांनी दुकानावर दारू खरेदी करताना सोशल डिस्टन्स पालन केले नाही गर्दी केली याचा तान जर प्रशासनावर पडला तर प्रशासन ही दारू विक्रीची दुकाने बंद ही करू शकतो तेव्हा सोशल डिस्टन्स चे पालन करून दारू खरेदी करावी असेही आवाहन करण्यात आले आहे.

सोशल डिस्टन्स पाडावे लागणार
दारू खरेदी करताना सोशल डिस्टन्स पाडावे लागणार आहे. ज्यांनी मास्क घातलेला आहे अशांनाच दारू विक्री केली जाणार आहे. परंतु, असेही असताना रस्त्यावर कोणी थुंकताना आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
-स्नेहा सराफ, अधीक्षिका, राज्य उत्पादन शुल्क विभाग अकोला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT