विदर्भ

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले; राजस्थानमधील तिघांना अटक

सकाळ वृत्तसेवा

वरोरा (जि. चंद्रपूर) : तालुक्यातील पिंपळगाव (शिंगरू) या गावातील अल्पवयीन मुलीला फूस लावून राजस्थानमध्ये नेले व विवाह लावून दिल्याची तक्रार मुलीच्या पित्याने वरोरा पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. त्यानंतर वरोरा पोलिसांच्या एक पथकाने राजस्थान गाठून तिघांना अटक केली व मुलीलाही गावात सुखरूप आणले. रामस्‍वरूप केसरीलाल बरवा (वय ३२), छोटूलाल माधवलाल बरवा आणि तस्वीर छोटूलाल बरवा अशी अटकेतील व्यक्तींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील पिंपळगाव (शिंगरू) येथील एका अल्पवयीन मुलीला रामस्वरूप केसरीलाल बरवा याने प्रेमाच्या जाळ्यात ओढले. काही दिवस त्यांचे प्रेमप्रकरण सुरू होते. त्याने अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखविले. मुलगी त्याच्या आमिषाला बळी पडली. रामस्वरूप बरवा याने अल्पवयीन मुलीस राजस्थान राज्यातील शाडोल (ता. विटवा, जि. कोठा) या गावी नेले. काही दिवस घालविल्यानंतर त्या मुलीसोबत विवाह करण्यात आला.

इकडे पिंपळगावात अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याने वडिलाने सर्वत्र शोधाशोध सुरू केली. मात्र, तिचा काहीच पत्ता लागला नाही. तिच्या मैत्रिणीची विचारपूस केली असता त्यांचे प्रेमप्रकरण समोर आले. अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविल्याची तक्रार पित्याने वरोरा पोलिस ठाण्यात केली होती. तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी रामस्वरूप बरवा राहत असलेले राजस्थानीतील कोठा गाव गाठले. तेथून रामस्‍वरूप केसरीलाल बरवा, छोटूलाल माधवलाल बरवा, तस्वीर छोटूलाल बरवा या तिघांना अटक करून गुन्हा दाखल केला. अल्पवयीन मुलीला वडिलांच्या ताब्यात देण्यात आले. अधिक तपास वरोरा पोलिस करीत आहे.

चंद्रपूर, सिंदेवाहीत मुली विक्रीचे प्रकरण

जिल्ह्यात चंद्रपूर, सिंदेवाही येथे अल्पवयीन मुलींना लग्नाचे आमिष दाखवून विक्री करण्यात आल्याचे प्रकरण काही वर्षांपूर्वी उजेडात आले होते. या दोन्ही प्रकरणात पोलिसांनी एका टोळीचा पर्दाफाश केला होता. चंद्रपूर शहरातील बंगाली कॅम्प परिसरातील अल्पवयीन मुलीस गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध करण्यात आले. काही महिन्यांनी तिची विक्री करण्यात आली होती. ती पळून चंद्रपुरात आल्यानंतर हे प्रकरण समोर आले होते. सिंदेवाही तालुक्यातील एका खेड्यातील दोन मुलींचीही नागपुरातील महिलेने विक्री केली होती. रेल्वे स्थानकावरून त्या पळून आल्यानंतर ते प्रकरण उजेडात आला होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara IT Park : कोल्हापूर-साताऱ्यात आयटी पार्कचा मार्ग मोकळा, म्हसवड MIDC साठीही तब्बल 500 कोटी; मंत्री उदय सामंत यांचा मोठा निर्णय

Satara District bank Election : सातारा जिल्हा बॅंक निवडणुकीबाबत मंत्री जयकुमार गोरेंच्या वक्तव्यावर मंत्री उदय सामंत यांचा सावध पवित्रा

Uday Samant : यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने राज्यात स्वतंत्र अनुवाद समिती स्थापन करणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा

वरिष्ठ IAS अधिकारी बेपत्ता, मोबाईही बंद; शेवटचं लोकेशन बंगळुरु विमानतळावर

Nagpur News : नऊ दिवसांपासून नवजात बालिकेच्या शोधात फिरत होती महिला; मुलगी मेल्याने होती अस्वस्थ, रिक्षामधून उडी मारण्याचाही प्रयत्न

SCROLL FOR NEXT