Sale of minor girl Rajasthann Four arrested racket police crime vidarbha esakal
विदर्भ

Crime News : अल्पवयीन मुलीची राजस्थानात विक्री

चौघांना अटक; रॅकेटची पाळेमुळे खणणार

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : आर्थिकदृष्ट्या दुर्बल परिवारातील तंगीचा फायदा घेत त्यांच्या अल्पवयीन मुलींची राजस्थानमध्ये विवाह लावून देण्याच्या नावाखाली विक्री करणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.

गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका बेपत्ता युवकाच्या शोधासाठी गाडगेनगर पोलिसांनी केलेल्या तपासानंतर ही बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी संतोष रामधन इंगळे (वय ३४, रा. शिवणी अकोला), मुकेश ज्ञानदेव राठोड (वय ४०, रा. अकोला) व एका महिलेला अटक केली आहे. अद्यापही या टोळीची सूत्रधार असलेली महिला पसार असून पोलिसांकडून तिचा शोध घेतला जात आहे.

शेगाव परिसरातील आकाश वेरूळकर नामक युवक काही दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या कुटुंबीयांनी गाडगेनगर पोलिसांत दिली होती. त्यानुसार ठाणेदार आसाराम चोरमले यांच्या मार्गदर्शनातील पथकाने बेपत्ता युवकाचा शोध सुरू केला.

हा शोध सुरू असतानाच याच भागातील एका अल्पवयीन मुलीला राजस्थानमध्ये चार ते पाच लाख रुपयांना विकण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली. राजस्थानमध्ये विकण्यात आल्याचे कळताच सदर मुलीने आपली सुटका करून घेतली व पोलिसांना सर्व घटनाक्रम सांगितला. डीबी पथकातील पोलिसांनी अकोला येथे जाऊन संशयित आरोपींना अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी VVIP नाहीत, तातडीने सुनावणी घ्या; याचिकाकर्त्याच्या मागणीवर सुप्रीम कोर्टाने फटकारलं, म्हणाले...

Aditya Thackeray Shares Student Video : कोल्हापुरातील विद्यार्थ्याचा व्हिडिओ आदित्य ठाकरेंकडून शेअर; फडणवीसांना थेट सवाल, उद्धव ठाकरेंशीही फोनवरून चर्चा

Jalgaon News: तामिळनाडुचे मुख्यमंत्री विजय यांचं फेक अकाउंट, जळगाव कनेक्शन समोर; होमगार्डची चौकशी

Marathi News Live Updates : लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ACB ची धाड

Education Institution Corruption: शिक्षण संस्थेत भ्रष्टाचाराचे आरोप, तपास समिती चौकशीला आली असतानाच प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू; काय घडलं?

SCROLL FOR NEXT