Kautikrao-Thale-Patil 
विदर्भ

संमेलन हेच महामंडळाचे मुख्य कार्य - कौतिकराव ठाले-पाटील

सकाळवृत्तसेवा

नागपूर - संपूर्ण जगातील मराठी माणसांसाठी साहित्य संमेलन आयोजित करून त्यांना एका व्यासपीठावर आणणे हेच अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे मुख्य कार्य आहे. पण, महामंडळच इतर उपक्रमांचे आयोजन करायला लागले, तर घटक संस्थांनी काय करायचे, असा सवाल महामंडळाचे नवे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी आज केला. संमेलनांच्या व्यतिरिक्त महामंडळ काय करतं, असा सवाल विचारणाऱ्यांसाठी आपली ही भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कार्यालय आज विदर्भ साहित्य संघाकडून मराठवाडा साहित्य परिषदेकडे हस्तांतरित करण्यात आले.

विदर्भाच्या कार्यकाळातील अखेरची बैठक आज नागपुरात पार पडली. या बैठकीत महामंडळाच्या अध्यक्षपदी ठाले-पाटील, उपाध्यक्ष म्हणून विद्या देवधर, कार्यवाह दादा गोरे, तर कोषाध्यक्ष म्हणून रामचंद्र साळुंखे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. बैठकीनंतर ठाले-पाटील पत्रकारांशी बोलत होते. महामंडळाला संमेलनांच्या गर्तेतून काढण्याचा संकल्प डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी सोडला होता. त्याअनुषंगाने ठाले-पाटील बोलत होते.

‘देशभरातील मराठी भाषेचे आणि माणसाचे विस्कळितपण दूर करण्यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची स्थापना करण्यात आली.

पण, चार घटक संस्थांच्या व्यतिरिक्त पाचवी संस्था म्हणून महामंडळाचा विचार होणार नाही, याचीही काळजी घेण्यात आली. त्यामुळे चर्चासत्र असो, ग्रामीण भागातील संमेलने असो याशिवाय विविध छोटे-मोठे उपक्रम घटक संस्थांनी घेणे अपेक्षित आहे. महामंडळाचे मुख्य काम वर्षातून एक संमेलन आयोजित करणे एवढेच आहे, असे ते म्हणाले.

संमेलनाध्यक्षांची निवडणूकच!
‘अकराशे लोकांनी केलेली संमेलनाध्यक्षांची निवडणूक आणि १९ लोकांनी केलेली निवड, असे कसे म्हणता येईल? एकमताने एखाद्या नावावर शिक्कामोर्तब झाले, तरच ती निवड म्हणता येईल. पण, यवतमाळच्या संमेलनापूर्वी अध्यक्षपदासाठी १९ लोकांनी वेगवेळ्या नावाच्या बाजूने मत दिले. त्यातून ज्या नावाच्या बाजूने अधिक मतं पडली, ते नाव अध्यक्षपदासाठी घोषित करण्यात आले. पण, त्यामुळे ती निवड ठरत नाही,’’, असे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT