Candle Agitation Sakal
विदर्भ

Sindkhed Raja News : समृध्दी महामार्गावर नागरिकांकडुन २५ मेणबत्ती लावून अनोखे आंदोलन

सिंदखेड राजा तालुक्यातील पिंपळखुटा गांवाजवळ १ जुलै रोजी समृध्दी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्सचा अपघात होवुन २५ प्रवाशांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला होता.

सकाळ वृत्तसेवा

सिंदखेड राजा - तालुक्यातील पिंपळखुटा गांवाजवळ १ जुलै रोजी समृध्दी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्सचा अपघात होवुन २५ प्रवाशांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला होता. समृद्धी महामार्गाच्या अपघाताला पाच महिने उलटून गेलेत. मात्र अद्यापही सरकारकडून मदत न मिळाल्याने मृतांच्या नातेवाईकांनी वर्धा येथे आंदोलन सुरू केले.

त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून सिंदखेडराजा येथील अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पदाधिकरी व इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी अपघातस्थळी जाऊन 19 डिसेंबरच्या मध्यरात्री २५ मेणबत्या पेटवून मृत व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण केली. मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना सरकारने जाहीर केलेली मदत तत्काळ देण्यात यावी, यासाठी वर्धा येथील आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे.

समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातामध्ये २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता, या भयंकर घटनेने अवघा महाराष्ट्र हादरुन गेला होता. समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातग्रस्त प्रवाशांना मदत व मृत व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी ॲड. संदीप मेहेत्रे, शेख यासिन, बुधू चौधरी, खलील शेख यांच्यासह स्थानिक नागरिकांनी मदत केली होती.

त्याच स्थानिक नागरिकांनी १९ डिसेंबर रात्री आगळे वेगळे आंदोलन केल्याचे पाहायला मिळाले. या अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना शासनाकडून अद्याप कोणतीच मदत मिळाली नाही. याच पाश्वभूमीवर सरकारला जागे करण्यासाठी समृद्धीवरील अपघात स्थळी अनोखे आंदोलन करण्यात आले आहे.

यावेळी ॲड संदीप मेहेत्रे यांनी सांगितले की, अपघात झाल्यानंतर अपघात स्थळी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासह मंत्री खासदार आमदार या ठिकाणी येऊन अपघात स्थळाची पाहणी केली होती. त्यांच्या नातेवाईकांची भेट घेऊन मदत जाहीर केली होती. परंतु ती मदत अद्यापही मिळाली नाही.

व संबंधित ट्रॅव्हल्स मालकाकडून मदत मिळाली नसल्यामुळे वर्धा येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व मृत लोकांच्या आत्म्याला शांती लाभावी यासाठी २५ मेणबत्त्या लावुन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. तसेच शासनाकडून तात्काळ मदतीची मागणी यावेळी त्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nilesh Ghaywal Acquitted : निलेश घायवळसह सहा आरोपींची निर्दोष मुक्तता; मोका न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल

Bank Holiday October 2026: ऑक्टोबरमध्ये बँका 16 दिवस बंद! महाराष्ट्रात किती दिवस सुट्टी? पाहा RBIची संपूर्ण यादी

Chiplun Municipality : चिपळूण नगरपालिकेत नोकरीसाठी 15 लाखांची मागणी? सत्ताधारी नगरसेवकाच्या गंभीर आरोपामुळे खळबळ, प्रशासनाचे स्पष्टीकरण

‘या’ राशींचे लोक असतात खूप जास्त इमोशनल, भावनेच्या भरात घेतात निर्णय, नंतर होतो पश्चात्ताप; त्यांच्या या स्वभावाचा फायदा घेतात लोक

Marathi News Live Updates: मुंबई-अहमदाबाद मार्गावर भीषण वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT