Samruddhi Highway Accident Esakal
विदर्भ

Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावर चालकाला डुलकी लागल्याने भीषण अपघात; तीन जणांचा मृत्यू

Samruddhi Highway Accident: चालकाला झोप लागल्याने बाजूच्या कंटेनरला धडक बसल्याने हा अपघात झाला आहे. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला तर काही जण जखमी झाले आहेत. अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

समृद्धी महामार्गावर पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. चालकाला झोप लागल्याने बाजूच्या कंटेनरला धडक लागल्याने हा भीषण अपघात झाला आहे. अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली आहे. अहमदनगरहून रायपूरकडे जाणाऱ्या खासगी टेम्पो ट्रॅव्हलची बाजूच्या कंटेनरला धडक लागल्याने हा भीषण अपघात झाला आहे.(Samruddhi Highway Accident)

मिळालेल्या माहितीनुसार, चालकाला पहाटे झोप लागल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला आहे. अमरावती जिल्ह्यातील वाढोना शिवणी दरम्यान चॅनल 128 वर हा अपघात आहे. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. तर काही जण जखमी आहेत.

अपघातातील जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून पसार झाला. या अपघाताचा पुढील तपास तळेगाव दशासर पोलीस करत आहेत. समृध्दी महामार्गांवर अपघातांचे सत्र सुरूच आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

SCROLL FOR NEXT