संदीपान भुमरे  
विदर्भ

संदीपान भुमरे पाटील यवतमाळ जिल्ह्याचे नवे पालकमंत्री; साठ दिवसानंतर मिळाले जिल्ह्याला ‘पालक’

सकाळ डिजिटल टीम

यवतमाळ : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. तेव्हापासून जिल्ह्याला पालकमंत्री नव्हते. कोरोनाच्या वाढत्या प्रादुभार्वातही ‘पालका’विनाच प्रशासन बाजू सांभाळून होते. अखेर शुक्रवारी (ता.16) जिल्ह्याला नवे पालकमंत्री मिळाले आहे.

राज्याचे रोजगार, स्वयंरोजगार व फलोत्पादनमंत्री शिवसेना आमदार संदीपान भुमरे पाटील यांचेकडे जिल्ह्याची जबादारी देण्यात आली आहे. त्यामुळे साठ दिवसानंतर जिल्ह्याला पालकमंत्री मिळाले आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या दीड वर्षांतील सर्वाधिक रुग्ण संख्या शुक्रवार (ता.16) समोर आली. एका दिवसात एक हजार 267 रुग्ण पॉझिटिव्ह आले असून तब्बल 26 मृत्यू झाले आहे. अशीस्थिती असतानाही जिल्ह्याला पालकमंत्री नव्हते. त्यामुळे अनेक बाबीवर त्यांचा परिणाम दिसून आला.

पालकमंत्री नियुक्त करण्यासाठी मागणी होती. मात्र, अतंर्गत राजकारणात कुणाकडे पदभार द्यावा, अशी चर्चाही समोर आली होती. दोन महिण्याच्या प्रतिक्षेनंतर जिल्ह्याला पालकमंत्री मिळाले आहे. औरगाबाद जिल्ह्यातील पैठण विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे तसेच राज्याचे रोजगार,स्वंयरोजगार व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे पाटील यांचेकडे जबाबदारी देण्यात आली आहे.

संपादन - अथर्व महांकाळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: 'व्हीएसआर'च्या विमान उड्डाणांवर बंदी; बारामती विमान अपघात प्रकरणी DGCAची मोठी कारवाई

Pune Crime : बारावीचा पेपर संपताच कोथरूडमध्ये विद्यार्थ्यावर कोयत्याने वार; दोन अल्पवयीन ताब्यात

Fruit Drink Maaza: 'माझा'च्या छोटा पॅकमध्ये आढळली घाण; ११ वर्षीय मुलाची प्रकृती बिघडली

Kukadi Project : कुकडी प्रकल्पातून उन्हाळी पहिल्या आवर्तनात 7.6 टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय

Katraj Accident : कात्रज बोगद्याजवळ दरीपुलावर अपघातात ट्रक चालक ठार, सातजण जखमी

SCROLL FOR NEXT