Sanjay Gandhi Niradhar Yojana bank Delay in crediting funding sakal
विदर्भ

Sanjay Gandhi Niradhar Yojana : वृद्ध निराधारांना बॅंकांनी आणले नाकीनऊ

निधी देऊनही खात्यावर रक्कम टाकण्यास उशीर

मनोहर बेले

अंबाडा : संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजना ग्रामीण भागातील लोकांसाठी आधार असल्या तरी त्यांच्या या आधारात खोडा घालण्याचे काम बॅंकांकडून होता आहे. संबंधित विभागाकडून आलेला निधी निराधारांच्या खात्यावर टाकण्यास बॅंकेकडून उशीर होत असल्याने त्यांच्याकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

संजय गांधी निराधार व श्रावणबाळ ही योजना अनेक वृद्धांना व विधवा महिलांना आधार देत आहे, तर दुसरीकडे बँक सातत्याने त्यामध्ये अडथळा निर्माण करीत आहे. श्रावणबाळ संजय गांधी निराधार योजनेच्या वृद्धांच्या व विधवा महिलांच्या सुखी संसारात बँका अडथळा निर्माण करीत आहेत. तहसीलदारांनी बँकांना किती तरी दिवस निधी दिला, मात्र वृद्धांच्या व विधवा महिलांच्या खात्यावर बॅंका पैसेच टाकत नाही.

नरखेड तहसीलदारांनी बँकेला निधी देऊनही बँक खात्यावर पैसे टाकण्यात विलंब करतात, असा आरोप आहे. तर अनेक वृद्धांना बँकेमध्ये उन्हात फेऱ्या माराव्या लागत आहेत. तर विधवा महिलांना आपल्या अनुदानाच्या रकमेचा अर्धा हिस्सा येण्या-जाण्यात खर्च करावा लागतो आहे. नुकतीच मुंबईच्या सभेत झालेल्या उन्हाच्या चटक्याने अनेक निष्पापांचे बळी गेले, तरी पुन्हा अशा घटना घडल्यास याला बँक जबाबदार राहील, असा सवाल वृद्धांनी केला आहे.

ही परिस्थिती नरखेड बँकेत आहे, अशी नाही. ही स्थिती परिस्थिती इतरही बॅंकांची आहे. बँकेचा मनमानी कारभार सुरू आहे. अनाथ,वृद्ध अपंग,विधवा यांना होणारा त्रास बँकेने कमी करावा.

-सागर पारधी, अध्यक्ष,सामाजिक संघटना

वयोमानानुसार माझ्याकडून आता काम होत नसल्याने शासन काही तुटपुंजी मदत का होईना महिन्याला मदत देते. मात्र शासन तत्काळ असली तरी बँकेचा भयानक त्रास सहन करावा लागतो.

-हरिभजन गेडाम, वृद्ध व्यक्ती

श्रावणबाळ,निराधार अपंग कल्याण,विधवा माता या विभागात गेल्या दोन वर्षांपासून नायब तहसीलदार म्हणून नरखेड तहसीलचे काम पाहतोय. शासनाने तहसील कार्यालयात निधी वर्ग केला की लगेच सर्व बँकांना वितरित करतो.तातडीने प्रत्येकाच्या खात्यात जमा करण्यास पत्र सुद्धा देतो. परंतु बँक कर्मचारी तहसीलदारांचे आदेशाची सुद्धा पायमल्ली करतात.अनेक वृद्ध कार्यालयात पगार जमा झाला नसल्याची माहिती घेण्यास येतात, तेव्हा जीव कासावीस होतो.

-श्री. तरोडकर साहेब, नायब तहसीलदार नरखेड

अनेकदा या तक्रारींचे निवारण करण्यासाठी नरखेडच्या बँकेत गेलो होतो. मला उडवाउडवीची उत्तरे दिली गेली. कर्मचारी नसल्याचे कारण सांगितले. माझे समाधान झाले नाही. लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही तर वृद्धांना व विधवा महिलांना घेऊन बँकेसमोर आंदोलन करू.

-नंदलाल मोवाडे, सरपंच आग्रा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

Ladki Bahin Yojana: ''लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद'' पुढे काय होणार? ठाकरेंचा सरकारला टोला

आमिर खान यांना 'सितारे ज़मीन पर' च्या प्रचंड यशानिमित्त देशभरातील एग्झिबिटर्सकडून विशेष सन्मान!

कॅन्सरग्रस्त दीपिका कक्करला भेटायला पोहोचली मराठमोळी सोनाली कुलकर्णी; दोघींचा नेमकं नातं काय?

ELI Scheme : रोजगारवाढीसाठी 'ईएलआय' योजना: पंतप्रधान मोदींकडून मंजुरी; साडेतीन कोटी नोकऱ्यांचे उद्दिष्ट

SCROLL FOR NEXT