Sanjay Rathore will resign soon political news 
विदर्भ

वनमंत्री संजय राठोड देणार राजीनामा; चर्चांना आले ऊत

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : टिकटॉक स्टार पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे. त्यांच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दबाव टाकला होता. त्यामुळे राठोड यांना राजीनामा दिल्याची चर्चा आहे.

पूजा चव्हाण इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून पडल्याने ८ फेब्रुवारी रोची तिचा मृत्य झाला होता. महम्मदवाडी परिसरातील हेवन पार्क सोसायटीतील फ्लॅटमधअये पूजा ही भाऊ आणि भावाच्या मित्रासोबत राहत होती. पूजाचा मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणात संजय राठोड यांचे नाव समोर आले होते. काही ऑडिओ क्लिपही समोर आल्या होत्या. यातील आवाज संजय राठोड यांचाच असल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात आला आहे. हे प्रकरण तापल्याने राठोड यांनी पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे.

पूजाच्या मृत्यूला राठोडच कारणीभूत असल्याने त्यांचा राजीनामा घेण्याची मागणी विरोधकांकडून सातत्याने केली जात आहे. अद्याप पोलिस तपासातून काहीच उलगडा झालेला नाही. राठोड पूजाच्या मृत्यूनंतर गायब झाले आहेत. त्यांचा फोनही नॉट रिचेबल आहे. त्यामुळे त्यांच्यावरील संशयाचे सावट गडद झाले आहे. परिणामी, त्यांचा राजीनामा घेण्यासाठी शिवसेनेवर दबाव वाढला आहे.

राठोड हे लवकरच राजीनामा देण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांना त्यांना राजीनामा देण्यास सांगितल्याचे वृत्त आहे. शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांचीही बैठक होणार असून त्यामध्ये यावर शिक्कामोर्तब केले जाऊ शकते. राठोड यांच्याकडूनही राजीनामा देण्याची तयारी असल्याचे समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : कोकणात अडकलेला मान्सून पुढे सरकणार, पण मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात कधी पोहोचणार? हवामान विभागाकडून अपडेट जारी

Plastic Waste Drive: उरुळी कांचनमध्ये ‘माझे प्लास्टिक – माझी जबाबदारी’ संकल्पनेतून प्लास्टिक बँक; १ किलो प्लास्टिकच्या बदल्यात महिलांना साखर, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य

IND vs AFG, ODI: रोहित शर्मा रनआऊट झाल्यानंतर नक्की काय म्हणाला? शुभमन गिलनेच केला खुलासा

Illegal Pistol Seized: इंदापूरमध्ये अवैध गावठी पिस्तूलासह युवक अटक; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडक कारवाई

MP Train Accident : एक्सप्रेसमध्ये आगीची अफवा पसरताच प्रवाशांच्या रुळावर उड्या, दुसऱ्या ट्रेनने अनेकांना चिरडले; ५ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT