file photo
file photo 
विदर्भ

संकल्प गुप्ता बनला आंतरराष्ट्रीय मास्टर

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करणारा नागपूरचा बुद्धिबळपटू संकल्प गुप्ता याने बुद्धिबळातील प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय मास्टर किताब पूर्ण केला आहे. गोवा येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय खुल्या ग्रॅण्डमास्टर्स (कॅटेगरी ए) बुद्धिबळ स्पर्धेत लागोपाठ दुसरा विजय नोंदवून आंतरराष्ट्रीय मास्टर किताबाची औपचारिकता पूर्ण केली. असा बहुमान मिळविणारा तो अनुप देशमुख व रौनक साधवानीनंतर नागपूरचा तिसरा बुद्धिबळपटू ठरला आहे.
16 वर्षीय संकल्पला आंतरराष्ट्रीय मास्टर किताब मिळविण्यासाठी बरीच प्रतीक्षा करावी लागली. त्याने जानेवारी 2017 मध्ये स्वीडन येथील स्पर्धेत पहिला नॉर्म मिळविल्यानंतर 19 महिन्यांनी ऑगस्ट 2018 मध्ये अबुधाबी येथील स्पर्धेत त्याने दुसरा नॉर्म मिळविला होता. ऑक्‍टोबर 2018 मध्ये ग्रीस येथे झालेल्या स्पर्धेत केवळ नऊ रेटिंग गुण कमी पडल्याने त्याची "आयएम'ची संधी थोडक्‍यात हुकली होती. अखेर गोवा येथील स्पर्धेतील दुसऱ्या फेरीत त्याने ए. बालकिशनला नमवून 2400 येलो रेटिंग गुणांचा टप्पा पूर्ण करीत आंतरराष्ट्रीय मास्टर किताबावर शिक्‍कामोर्तब केले. अनुपने 1999 मध्ये, तर रौनकने मे 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय मास्टर मिळविला होता. रौनक महाराष्ट्रातील सर्वात युवा "आयएम' आहे. नागपूरच्या दिव्या देशमुखनेही कमी वयात महिला आंतरराष्ट्रीय किताब मिळविलेला आहे.
संकल्पचा ग्रॅण्डमास्टरला दणका
आंतरराष्ट्रीय मास्टर किताब पूर्ण करणाऱ्या संकल्पने गोवा येथील आंतरराष्ट्रीय खुल्या ग्रॅण्डमास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेतील तिसऱ्या लढतीत ब्राझीलचा ग्रॅण्डमास्टर ऍलेक्‍झांडर फिएरवर धक्‍कादायक विजय नोंदवून "आयएम' किताबाचा आनंद थाटात "सेलिब्रेट' केला. आंतरराष्ट्रीय मास्टर अनुप देशमुख व दिव्या देशमुखनेही तिसऱ्या फेरीत प्रतिस्पर्ध्यांवर निर्णायक विजय नोंदविले. अनुपने (2 गुण) किरण पंडितरावला, तर दिव्याने (2 गुण) वेदांत गोस्वामीवर विजय नोंदविला. सृष्टी पांडे, फिडे मास्टर शैलेश द्रविड, वैभव राऊत व इंद्रजित महिंद्रकरला मात्र पराभवाचा सामना करावा लागला. सृष्टीला (0.5 गुण) सोहम दातारकडून, शैलेशला (1 गुण) वाय. ग्रहेशकडून, वैभवला (0.5 गुण) प्रचिती चंद्रतेयकडून आणि इंद्रजितला ग्रॅण्डमास्टर ग्रुकेश डी. कडून पराभव पत्करावा लागला. महिला चेसमास्टर मृदुल डेहनकर (0.5 गुण) आणि जयचंद्र श्रीनिवास वेल्लांकी यांच्यातील सामना बरोबरीत सुटला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'7 दिवस पत्नी अन् 7 दिवस प्रेयसीसोबत राहतो'; कराराच्या आधारे कोर्टाने केली आरोपीची सुटका

Sanju Samson Fined : अंपायरशी वाद घालणे आले अंगलट... BCCI ची संजू सॅमसनवर मोठी कारवाई; काय आहे संपूर्ण प्रकरण

Kolhapur Lok Sabha : मुश्रीफांच्या सांगण्यावरून कारवाई करत असाल तर मीही छत्रपतीये, याद राखा; संभाजीराजेंचा कोणाला इशारा?

Latest Marathi News Live Update : अमित शहा यांची आज जालन्यात सभा

Share Market Opening: गुंतवणूकदार चिंतेत! शेअर बाजारात पुन्हा घसरण; 'या' शेअर्सचे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT