संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
विदर्भ

आता येथे होणार नाहीत सांस्कृतिक कार्यक्रम...

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना करीत आहे. मात्र, आकडा वाढत असल्याने क्वारंटाईनसाठी निश्‍चित करण्यात आलेली ठिकाणे अपुरी पडू लागली. त्यामुळे नवीन जागांचा शोध घ्यावा लागत आहे. अशा वेळी मोठी हॉटेल्स, सभागृहे ताब्यात घेण्यात येत आहे. अमरावतीतही असेच एक प्रसिद्ध सांस्कृतीक सभागृह ताब्यात घेण्यात आले.


विदर्भासह राज्यातील नाट्य कलाकारांचे आश्रयस्थान असलेल्या संत ज्ञानेश्‍वर सांस्कृतिक भवनाचे रूपांतर आता क्वारंटाइन सेंटरमध्ये होत आहे. येथे पेड क्वारंटाइन रुग्णांची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी सांगितले. संत ज्ञानेश्‍वर सांस्कृतिक भवन येथे नाटकांसह इतर सांस्कृतिक व राजकीय कार्यक्रम वर्षभर होतात. नाट्य क्षेत्रासाठी तर हे भवन मोठे आश्रयस्थान आहे. राजकीय पक्षांनाही इनडोअर सभा व मेळावे घेण्याची सोय असून सांस्कृतिक व सामजिक कार्यक्रमांसाठी या भवनात सोयी सुविधा आहेत. भवनातील आर्ट गॅलरीमध्ये चित्रकला व फोटो प्रदर्शनी भरतात. कोरोनाच्या संक्रमणाने या सांस्कृतिक भवनास टाळे लागले आहे. मार्च महीन्यापासून ते बंद असून वाढत्या संक्रमणामुळे इतक्‍यात सुरू होण्याची शक्‍यता नाही. सद्या हे भवन कंत्राटावर देण्यात आले आहे.

महानगरातील संक्रमीत रुग्णांची वाढती संख्या व हायरिस्क व लोरिस्क रुग्णांना क्वारंटाइन करण्याकरिता महापालिकेने उभारलेली सेंटर कमी पडू लागली आहेत. संक्रमणाचा शिरकाव उच्चभ्रू वसाहतींमध्येही झाल्याने अनेकांनी पेड क्वारंटाइन सेंटरची व्यवस्थेची मागणी केली आहे. संत ज्ञानेश्‍वर भवन महापालिकेच्या मालकीचे असून वाहतुकीसाठी सोईस्कर आहे. तेथे अशी व्यवस्था करण्याची महापालिकेची योजना आहे. त्यादृष्टीने आयुक्तांनी पाहणी करण्याकरिता विधी अधिकारी श्रीकांत चौहान यांना पाठविले होते. त्याचप्रमाणे आरोग्य व स्वच्छता विभागासही व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत. संत ज्ञानेश्‍वर सांस्कृतिक भवनात सर्व सोयी सुविधायुक्त बारा रूम्स असून प्रशस्त आर्ट गॅलरी आहे. भरपूर मोठा मोकळा परिसर आहे. मुख्य मार्गावर असल्याने वाहतुकीच्या सर्व सुविधा आहेत. शिवाय कोविड रुग्णालयेही जवळ आहेत. त्यामुळे नागरिकांच्या मागणीहून पेड क्वारंटाइन सेंटर सुरू करण्यात येणार असल्याचे आयुक्त प्रशांत रोडे यांनी सांगितले.

संपादन - नरेश शेळके

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सुप्रिया सुळेंकडून दत्तात्रय भरणेंविरोधात तक्रार दाखल

UAPA: ओसामा बिन लादेनचे फोटो, ISIS चे झेंडे बाळगणे गुन्हा नाही: हायकोर्ट

MS Dhoni : अखेर सत्य आले समोर! रणनीती नाही तर... या कारणामुळे ९व्या क्रमांकावर बॅटिंगसाठी आला 'थाला'

Viral: पवार गटाचं काम करणाऱ्याला दत्ता भरणे यांच्याकडून शिवीगाळ? व्हिडिओ रोहित पवारांकडून शेअर

Met Gala 2024 : परी म्हणू की सुंदरा! रेड कार्पेटवर ईशाचाच जलवा, स्पेशल फ्लोरल ड्रेस बनवण्यासाठी लागले तब्बल 10 हजार तास

SCROLL FOR NEXT