file photo 
विदर्भ

संत हरिदाससुत कान्हाचे सापडले हस्तलिखित

आनंद सुरोशे

मुळावा (जि. यवतमाळ) : भारतभूमी ही संतांच्या साहित्याने व विचाराने सदैव सुगंधित असते. असेच संत हरिदाससुत कान्हाचे हस्तलिखित उमरखेड तालुक्‍यातील छोट्याशा गावात "बेलखेड' या गावी सापडल्याने "बेलखेड' हे गाव निश्‍चितच तालुक्‍यातील सर्वांच्या ओठावर असेल आणि बेलखेड या गावाचे पुरातन व इतिहासकालीन अस्तित्व प्रकाश झोतात येणार आहे.
वैचारिक घडामोडीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या व्यक्‍ती लहानसहान खेड्यातील आहेत. हे न विसरता संशोधक भारत रेधाडे यांनी बेलखेडमधील पुरातन हस्तलिखित शोधण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. धुळे येथील समर्थ वाग्देवता मंदिरातून हस्तलिखिताचा अभ्यास केला. संत हरिदास कान्हाचे हस्तलिखित प्राकृत ओवीबद्ध आहेत. प्राकृत ही भाषा देवनागरी लिपीत असल्याने सामान्य व्यक्‍तीला समजण्यासारखी आहे. हे हस्तलिखित दोन ते तीन भागांत आहेत. यातील 800 पाने व्यवस्थित असल्याचे सांगितल्या जाते. संत कान्हाच्या वडिलांचे नाव हरिदास, चिल्लाक, विठ्ठल कान्हा हे तीन अपत्ये असल्याचे हस्तलिखितावरून स्पष्ट होते. तर बोपा चिल्घळ यांचाही संदर्भही येतो. अर्थात, बेलखेडशी संत हरिदाससुत कान्हाच्या पूर्वजांचा संबंध असल्याचे बोलले जाते. बेलखेड या गावाचे मूळ नाव बिल्वक्षेत्र, बिल्वग्राम, बेलग्राम व आता बेलखेड झाले. परंतु, हस्तलिखित बाडामध्ये बेलखेडचा उल्लेख बेलखेट असल्याचा दावा केला जातो. हे गाव पैनगंगेच्या निसर्गरम्य वातावरणात आहे. संत तुकाराम महाराजांचे येळेगाव हेसुद्धा जवळच आहे. बेलखेड परिसरात पांढरी व रांगोळी ही जुनी गावे होती, ती काही वर्षांपूर्वीच नामशेष झाली. सापडलेली पुरातन समाधी अतिशय दुर्लक्षित अवस्थेत होती. बेलखेड गावातील दिलीप पाटील, भगवान पाटील, राजेश पाटील, गजानन पाटील, नरेंद्र पाटील, अतुल पाटील यांनी समाधीचा कायापालट करून, समाधी सुव्यवस्थित अवस्थेत आणण्यात पुढाकार घेतला व या स्थळाला मंदिरासारखे स्वरूप प्राप्त करून दिले. समाधी ज्या शेतात आहे त्या शेताला बेलखेडचे ग्रामस्थ "कान्होबाचे वावर' असे संबोधतात. संत हरिदाससुत यांचा ग्रंथ देवदानुचरेण आनंदेन यांनी शके 1531 का.शु. 12 ला लिहून पूर्ण केला. अंदाजे 350 ते 400 वर्षांपूर्वीची समाधी असावी, असा अंदाज रेघाटे यांचा होता. परंतु, संत हरिदाससुत कान्हा यांच्या संपूर्ण माहितीचे हस्तलिखित उपलब्ध झाल्यामुळे बेलखेड गावच्या ऐतिहासिक संशोधनाला महत्त्व प्राप्त होणार हे निश्‍चित. रेघाटेंच्या मतानुसार त्यांचे वडील श्‍यामराव रेघाटे, धोतु. वाघ, डॉ. बा. दा. जोशी, रेवजी काळे, सुंदर भांगे, अनंतराव वान्वरे, मनोहर सावळकर, नामदेव फटिंग आदी ग्रामस्थ या हस्तलिखिताविषयी माहिती सांगतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Chairman Salary: Tata Sons च्या चेअरमनला किती पगार मिळतो? नोएल टाटांच्या विरोधानंतर पद पुन्हा चर्चेत; आकडा पाहून धक्का बसेल!

Akola News : जिल्हाधिकाऱ्यांनी सोडले शेतकऱ्यांना वाऱ्यावर; महाबीज प्रशासनाकडून माहिती देण्यास नकार, एमडींनीही केले हात वर

Ai+ Nova 2 Power 5G भारतात लाँच! 16,999 रुपयांत खरेदीची संधी...पाहा फीचर्स अन् ऑफर्स!

Katraj Kondhwa Road Issue : आयुक्तांचे आश्वासन विरणार हवेत! कात्रज कोंढवा रस्ता; उर्वरित १० मिळकतींमुळे रस्ता रुंदीकरण रखडणार

Farmer Agitation : शेतकरी संकटात, सरकार कुठंय? लोहाऱ्यात हजारो शेतकऱ्यांचा आक्रोश; आमदारांना बोलण्यास मनाई करत शेतकऱ्यांनी सोयाबीन उधळले

SCROLL FOR NEXT