मोहाडी : शासकीय तलावाच्या जमिनीत अतिक्रमणाद्वारे केलेले सपाटीकरण. 
विदर्भ

मोहाडीच्या तलावात सरपंचाने केले अतिक्रमण...मग गावकऱ्यांनी केली तहसीलदारांकडे तक्रार

सकाळ वृत्तसेवा

गोरेगाव (जि. गोंदिया) : तालुक्‍यातील मोहाडी येथील महिला सरपंच व त्यांच्या पतीने गेल्या पाच वर्षांपूर्वी गावातील शासकीय तलावाच्या जमिनीत अतिक्रमण करून पक्की शौचालय इमारत, आवारभिंतीचे बांधकाम केले आहे.

तसेच दोन दिवसांपूर्वी त्यांनी तलावाच्या जमिनीत बाहेरून माती आणून त्याचे सपाटीकरण केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार गावकऱ्यांनी तहसीलदारांना सोमवारी (ता. 25) ऑनलाइन अर्जाद्वारे केली आहे.

गावकऱ्यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, मोहाडी येथे गावालगत गट क्रमांक 125, आराजी 2.12 हेक्‍टर आर. क्षेत्राचे शासकीय तलाव आहे. या तलावातील पाण्यापासून खरीप भात पिकाकरिता 50 एकर शेतजमिनीला पाणीपुरवठा केला जातो. अशा शासकीय तलावाच्या जमिनीत सरपंच रजनी धपाडे व त्यांचे पती अरविंद धपाडे यांनी 5 वर्षांपूर्वी अतिक्रमण केले. त्यात आवारभिंतीचे व शौचालय इमारतीचे बांधकामसुद्धा केले आहे. त्यामुळे तलावाचे सपाटीकरण झाले आहे.

...तर शेतीला पाणी मिळणार नाही

आता विनापरवाना बाहेरून माती खोदकाम करून आवारभिंतलगतच्या जमिनीवर सपाटीकरण करीत आहे. त्यामुळे या तलावातून शेतजमिनीला पुरेशा पाणी मिळणार नाही. त्याचा शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे. गावाच्या प्रथम नागरिकाने तलावात अतिक्रमण करणे म्हणजे ग्रामपंचायत अधिनियमाची पायमल्ली असल्याचा आरोपही गावकऱ्यांनी केला आहे.

अतिक्रमणाची चौकशी करून कारवाई करा

महिला सरपंचाचे पती शिक्षक आहेत. तलावाच्या जमिनीत अतिक्रमणाची चौकशी करून दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी धुर्वराज पटले, जागेश्वर पटले, परमानंद तिरेले, यादोराव पटले, श्रीराम पारधी, संजय पारधी, योगेश्वर पटले, देवचंद पटले, महेश बिसेन यांनी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी तिरोडा, मुख्य कार्यपालन अधिकारी, प्रधान सचिव महसूल विभाग, मुंबई यांना एका ऑनलाइन तक्रारीद्वारे केली आहे.

गावात राजकारण केले जात आहे
गावात राजकारण केले जात आहे. शौचालय इमारत बांधकाम, आवारभिंतीचे बांधकाम 15 वर्षांपूर्वीचे आहे. माती खोदकाम करून तलावात सपाटीकरण केले जात नाही. ती माती दिराच्या घरी बांधकाम असलेल्या जागेची आहे.
- रजनी धपाडे, सरपंच, मोहाडी.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : खळबळ!दिल्ली-गुजरात मॅच सुरू अन् अरुण जेटली स्टेडियमच्या गेटजवळ सापडली संशयास्पद बॅग, यंत्रणा सतर्क; काय होत त्यात?

बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी आहे का? तिसऱ्या महायुद्धाबद्दल काय केलं होतं भाकित? खरं काय जाणून घ्या

Pune Metro: बोअरवेल घेताना भूमिगत मेट्रोच्या बोगद्याला पाडलं छिद्र; पुणे कोर्टाने घरमालकाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

भारतीय राजकारणात मोठा बदल! संसद आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३% आरक्षण लागू होणार? विधेयकाला मोदी कॅबिनेटची मंजुरी

Mangalevedha Basaveshwar Memorial News: मंगळवेढ्यात महात्मा बसवेश्वर आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी सह्यांची लाट; एका दिवसात 1040 नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

SCROLL FOR NEXT