Students 
विदर्भ

आदिवासी विद्यार्थ्यांसाठी "मिशन आकार'; नीट, आयआयटी, जेईईच्या परीक्षेसाठी धडपड 

सुधीर भारती

अमरावती ः आदिवासी विद्यार्थी सुद्धा स्पर्धेमध्ये टिकावे, त्यांनाही तंत्रज्ञान तसेच वैद्यकीय क्षेत्रात काम करण्याची संधी उपलब्ध व्हावी, यादृष्टीने आदिवासी विद्यार्थ्यांसाठी यावर्षी शालेय सत्र संपल्यानंतर "मिशन आकार' चा प्रयोग अंमलात आणला. 

अमरावती आदिवासी विभाग अपर आयुक्तालयांतर्गत 83 शासकीय आश्रमशाळा व 122 अनुदानित आश्रमशाळा कार्यरत आहेत. यापैकी आश्रमशाळांना संलग्न 25 अनुदानित आश्रमशाळांना संलग्न 37 उच्च माध्यमिकचे वर्ग आहेत. या उच्च माध्यमिक आश्रमशाळांमध्ये वर्ग बारावी विज्ञानाची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना प्रथमच यावर्षापासून नीट, आयआयटी, जेईई व एम-सेट सारख्या प्रवेश परीक्षांसाठी शहरी विद्यार्थ्यांप्रमाणे मार्गदर्शन मिळावे, अधिकाधिक आदिवासी विद्यार्थी नामांकित वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये प्रवेशीत व्हावे याकरिता हे प्रशिक्षण प्रायोगिक तत्त्वावर सुरू केले. त्यासाठी अमरावती आदिवासी विकास विभाग, आकार बहुउद्देशीय ग्रामिण विकास संस्था नागपूर व आकार ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटशन्स, हिंगणा नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मिशन आकार हा प्रकल्प शासनाकडून कोणत्याही प्रकारचा निधी न घेता राबविला गेला. 

बारावी विज्ञान शाखेतून परीक्षा दिलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांकरिता दहा दिवसांचा ऑनलाइन रिव्हिजन वर्ग आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये दहा दिवस, गणित, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, विषयाचे ऑनलाइन मार्गदशन झाले. विद्यार्थ्यांना पीडीएफ स्वरूपात नोट्‌सही पुरविण्यात आल्या. दरवर्षी प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत परीक्षांची तयारी म्हणून दोन महिन्याचा निवासी वर्ग आयोजित केल्या जाते.

परंतु कोरोना संक्रमणाच्या काळात असे निवासी वर्ग आयोजित करणे शक्‍य न झाल्याने नुकसान टाळण्यासाठी अपर आयुक्त विनोद पाटील यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. ऑनलाइन रिव्हीजन वर्गाला गुगल फार्म द्वारे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धारणी, पांढरकवडा, पुसद, किनवट, कळमनुरी, औरंगाबाद व अकोला मधील शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या 251 विद्यार्थ्यांनी त्यासाठी नोंदणी केली होती. 

उच्चशिक्षणासाठी आवश्‍यक झालेल्या प्रवेशपूर्व परीक्षांचा दर्जा मोठा आहे. शहरातील विद्यार्थी दोन वर्षे अभ्यास करतात. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी भविष्यात शक्‍य झाल्यास असे नियमीत वर्ग सुरू करण्यासाठी प्रयत्न केल्या जाईल. 
- विनोद पाटील, अपर आयुक्त, आदिवासी विकास विभाग, अमरावती. 

संपादन - राजेंद्र मारोटकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT