School Students esakal
विदर्भ

School Education : विद्यार्थ्यांना तीन महिन्यांसाठी एकच पुस्तक! दप्तराचे ओझे कमी होणार

सायराबानो अहमद

धामणगावरेल्वे : राज्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांना एकात्मिक पद्धतीने चार भागांत पुस्तके वाटप होणार आहेत. सर्व विषयांचा एकत्र समावेश असलेले एक पुस्तक तीन महिन्यांच्या अभ्यासक्रमासाठी असेल. पाठ्यपुस्तकांतच वह्यांची पानेही दिलेली आहेत.

शाळांना ३० जूनपासून सुरवात होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तकाचे वाटप होणार आहे. यंदापासून विद्यार्थ्यांना नव्या रचनेत पुस्तके उपलब्ध झालेली आहेत. विद्यार्थ्यांसाठी सर्व विषयांच्या तीन-तीन महिन्यांच्या अभ्यासक्रमाची विभागणी करण्यात आली आहे. यानुसार वर्षभरासाठी एकूण चार पुस्तके आहेत.

समूह साधन केंद्रावरून शाळांना पुस्तकांचे वाटप सुरू करण्यात येणार आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना समारंभपूर्वक पुस्तकांचे वाटप करण्यासह अन्य महत्त्वाच्या सूचना मुख्याध्यापकांना दिल्या आहेत.

यासाठी गटशिक्षणाधिकारी मुरलीधर राजनेकर, शिक्षण विस्तार अधिकारी संजय ढिगवार, साबीर खान, नारायण अतकरे, केंद्रप्रमुख मनोहर पिकलमुंडे, नरेश पाटील, जगदीशकुमार शिरसाट, अजय बावणे, ज्ञानेश्वर राठोड, गटसमन्वयक धीरज जवळकार, साधनव्यक्ती कलेश कांबळे, शेषराव चव्हाण, रविकिरण खवले, प्रवीण ठाकरे, मिलिंद मोहोड, वैभव गवते, हेमंत कोटंबकर, मनोज शिंगणापुरे, ज्योती राऊत, सविता मळसणे, वैशाली लिलर्व्हे हे प्रयत्नशील आहेत.

पुस्तकातच वही

पाठ्यपुस्तकांमध्येच वह्यांच्या पानांचाही समावेश करण्यात आला आहे. माझी नोंद या शीर्षकाखाली ही पाने आहेत. या पानांचा वापर २१ प्रकारच्या नोंदी करण्यासाठी वापर करता येणार आहे.

धामणगावरेल्वे तालुक्यात इयत्ता पहिलीचे १०४३, दुसरी १०४९, तिसरी १२०२, चौथी १०६३, पाचवी १२९८, सहावी १२९२, सातवी १४२३, आठवीचे १४४१ पाठ्यपुस्तकाचे संच वितरित करण्यात येणार आहे.

- धीरज जवळकार, गटसमन्वयक गटसाधन केंद्र, धामणगाव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon News : जळगाव महापालिकेत लाचखोरीचा पर्दाफाश; लिपिक व समन्वयक एसीबीच्या जाळ्यात

Rajiv Gandhi : अन् राजीव गांधी मुंबईतून गेले ते कायमचेच! राजभवनातील माजी अधिकाऱ्याने सांगितली शेवटच्या भेटीची आठवण

Rain-Maharashtra Latest Live News Update: हिंगोलीत येलदरी धरणातून विसर्ग सुरू झाल्याने सिद्धेश्वर धरणाचे 4 दरवाजे उघडणार

Beed Crime: सुरेश धस यांचे कार्यकर्ते आहोत, असं म्हणत एकाला बेदम मारहाण; शिरुरमध्ये नेमकं काय घडलं?

Jalgaon Crime : जळगावात कौटुंबिक वादातून धक्कादायक घटना; पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला करत संपवले जीवन

SCROLL FOR NEXT