विदर्भ

मध्यान्ह भोजन : प्लॅस्टिकचा तांदूळ, छे हा तर पोषकच

सुधीर भारती

अमरावती : जिल्ह्यातील धानोरा कोकाटे गावात काल शालेय पोषण आहाराअंतर्गत विद्यार्थ्यांना देण्यात येणारा तांदूळ प्लॅस्टिकचा असल्याची अफवा पसरली. पालक तसेच ग्रामस्थांकडून तक्रार प्राप्त झाल्यानंतर शिक्षण विभाग व शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांनी जाऊन शहानिशा केली. शिजविलेला भात खाऊन गावकऱ्यांचा गैरसमज दूर केला. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातही प्लॅस्टिकच्या तांदळाचा पुरवठा करण्यात आल्याची केवळ अफवाच होती, हे सिद्ध झाले. (School-nutrition-diet-Plastic-Rice-Fortified-Rice-Amravati-District-news-nad86)

शासनाच्या वतीने मध्यान्ह भोजन योजना सुरू करण्यात आली आहे. योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दुपारच्या वेळी भाताचा आहार दिला जातो. मात्र, कोरोनामुळे दीड वर्षांपासून शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना पोषणाहार शिजवून देण्याऐवजी तो तांदळाच्या स्वरूपात थेट दिला जातो. धानोरा कोकाटे या गावात जि. प. शाळेत वितरित करण्यात आलेल्या तांदळात काही प्रमाणात प्लॅस्टिकसदृश तांदूळ असल्याचे आढळून आले. त्यानंतर पालकांनी याची तक्रारसुद्धा केली.

शालेय पोषणाहार कर्मचऱ्यांनी तेथे भेट दिली. तांदळामध्ये असलेले दाणे हे फोर्टिफाईट राइस असून यामध्ये लोह, फॉलिक अ‍ॅसिड तसेच व्हिटॅमीन बी १२, असे महत्त्वाचे पोषण घटक समाविष्ठ करण्यात आल्याने हा तांदूळ प्लॅस्टिकप्रमाणे दिसत असल्याचे स्पष्टीकरण शिक्षणाधिकाऱ्यांकडून देण्यात आले. लोहाची कमतरता, अशक्तपणा यावर या तांदळातील घटक गुणकारी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सदर तांदूळ हा पूर्वीपेक्षाही आता खाण्यासाठी अतिशय पोषक आहे. याबाबत समाजात प्रामुख्याने समाजमाध्यमांवर अनेक गैरसमज पसरविले जात आहेत. पालकांनी तसेच विद्यार्थ्यांनी कुठल्याही प्रकारच्या गैरसमजाला अथवा अफवांना बळी पडू नये, हा तांदूळ अतिशय पौष्टिक आहे.
- एजाज खान, शिक्षणाधिकारी प्राथमिक

(School-nutrition-diet-Plastic-Rice-Fortified-Rice-Amravati-District-news-nad86)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cabinet Expansion : मोदी कॅबिनेटमध्ये होणार मोठा गेमचेंजर! सर्वांच्या नजरा 'या' दोन नावांवर, अमित शाहांच्या भेटीनंतर दिल्लीत खळबळ!

Pali Flyover Construction Update : 34 ते 35 खांब आणि नवा आराखडा! मुंबई-गोवा हायवेवरील पाली उड्डाणपूल कधी सुरू होणार? समोर आली मोठी अपडेट

FIFA World Cup: पुण्यापेक्षाही लहान देश, पण पराक्रम गाजवलाय मोठा! पदार्पणातच गाठली नॉकआऊट, आता मेस्सीच्या अर्जेंटिनाला देणार टक्कर

Petrol-Diesel Price: कच्चे तेल 72 डॉलरवर घसरले! देशात पेट्रोल-डिझेल-CNG चे नवे दर जाहीर; तुमच्या शहरात किती आहे भाव?

Ketan Agarwal Murder : साखरपुडा, प्रेमसंबंध अन् टक्कल वादातून उलगडले रहस्य! सिया गोयलच्या भावाला चेतनच्या नात्याबद्दल माहिती होती

SCROLL FOR NEXT