file photo
file photo 
विदर्भ

गणवेशाविनाच विद्यार्थी शाळेत

सकाळ वृत्तसेवा

नागपूर  : पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थी शाळेत गणवेशात येतील, असा दावा शासनाकडून करण्यात आला. जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती उकेश चौहान यांनीही आश्‍वस्त केले होते. मात्र, सर्वांचा दावा फोल ठरला. शिक्षण सभापती यांनी दिलेल्या शाळेतच विद्यार्थी शालेय गणवेशात नव्हते. त्यामुळे शिक्षण व विद्यार्थ्यांप्रती पदाधिकारी, अधिकारी किती गंभीर आहेत, याची प्रचिती येते.
आज पहिल्या दिवशी शिक्षण सभापती, परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी आदींनी जिल्ह्यातील विविध शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले व मिठाईसुद्धा वाटली. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या दीड हजारांवर शाळा आहेत. आज पहिल्या दिवशी शिक्षण सभापती उकेश चौहान यांनी नरखेड तालुक्‍यातील बेलोना शाळेसह परिसरातील इतर शाळांना भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यासोबतच त्यांना मिठाईचा घासही भरवला. यावेळी चौहान यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. तसेच नियमित शाळेत येण्यासाठी प्रोत्साहित केले. स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करत जीवनात स्वच्छता किती महत्त्वाची आहे, याबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षकांच्या समस्याही जाणून घेतल्या. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव, प्राथमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनी हिंगणा तालुक्‍यातील जि. प.च्या वानाडोंगरी उच्च प्राथमिक शाळेला भेट दिली. त्यांनीही विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
पुस्तकांचे वाटप
विद्यार्थी, शिक्षक व मान्यवरांच्या उपस्थितीत शाळा समितीकडून गावात वृक्षदिंडी काढून शिक्षणाविषयी प्रबोधन करण्यात आले. त्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले. सोबतच विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनात गोड पदार्थ देऊन प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan: सौदीच्या प्रिन्सने पाकिस्तानला पाठवली ५० लोकांची खास टीम, शाहबाज सरकारसोबत नेमकं मिशन काय?

'चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमधून श्रीलंकेत हलवणार…?' दहशतवादी हल्ल्याच्या धमकीनंतर नेटकऱ्यांनी घेतली मजा

The Patna-Kota Express Train: स्टेशन मास्तरला झोप लागली अन्.. अर्धा तास हॉर्न वाजवत राहिला ट्रेनचालक

Latest Marathi News Update : गडचिरोलीत CRPF चे सर्च ऑपरेशन, मिळाले विस्फोटकांनी भरलेले सहा प्रेशर कुकर

Kangana Ranaut : ''निवडणूक जिंकले तर बॉलीवूड सोडणार'', कंगना रणौतने जाहीर केली भूमिका

SCROLL FOR NEXT