Second Janata curfew for people by people 
विदर्भ

कोरोना प्रतिबंधासाठी जनतेचाच दुस-या जनता कर्फ्यूचा स्वागतार्ह निर्णय

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी शनिवारी (ता.16) दुपारी तीन वाजतापासून सोमवारी सकाळी सात वाजतापर्यंत स्थानिक जनताच दुसरा जनता कर्फ्यू पाळणार आहे.

शहर आणि जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने गत आठवड्यात शनिवारी दुपारी तीन वाजतापासून तर सोमवारी सकाळी सात वाजतापर्यंत जनता कर्फ्यू घोषित केला होता. या जनता कर्फ्यूला जनतेतून मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्याच धर्तीवर स्थानिक दुसरा जनता कर्फ्यू शनिवारी (ता.16) दुपारी तीन वाजतापासून तर सोमवारी (ता.18) सकाळी सात वाजतापर्यंत पाळला जाणार आहे. या कालावधीत जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने व त्यासंबंधी आवागमन सुरू राहील. उर्वरित आस्थापना व दुकाने मात्र नागरिकांनी बंद ठेवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले.
जिल्ह्यात लॉकडाउन आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी संचारबंदी अद्यापही लागू आहे. सकाळी सात ते दुपारी तीन या वेळेत नागरिकांना गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी संचारबंदीत शिथिलता दिली जात आहे. जनता कर्फ्यूमध्ये जीवनावश्‍यक व अत्यावश्‍यक बाबी वगळून उर्वरित व्यवहार बंद ठेवले जाणार आहेत. नागरिकांनी या जनता कर्फ्यूला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले.

18,000 नागरिक जिल्ह्यातून रवाना 

जिल्ह्यातून आतापर्यंत सुमारे 17 ते 18 हजार नागरिक परप्रांतात आणि इतर जिल्ह्यात रवाना झालेले आहेत. परप्रांतात जाण्यासाठी आतापर्यंत जिल्हा प्रशासनाने एकूण 1265 पास वितरित केल्या आहेत. एका पासमध्ये सरासरी दहा व्यक्ती या हिशेबाने 12 हजार व्यक्ती परप्रांतात निघून गेले आहेत, तर आंतरजिल्हा अंतर्गत सुमारे 4500 व्यक्तींना जिल्ह्यातून जाण्यास परवानगी देण्यात आलेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Caste Validity Certificate : जातवैधता प्रमाणपत्राचा आग्रह न धरता तात्पुरता प्रवेश द्या; उच्च न्यायालयाकडून अंतरिम दिलासा

Rajendra Yadravkar : गोकुळ प्रचारावेळी यड्रावकरांच्या ताफ्याला सैनिक टाकळीत काळे झेंडे; प्रस्तावित एमआयडीसीविरोधात संताप, व्हिडिओ व्हायरल

D Mart Ganeshotsav Offers: गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी डीमार्टमध्ये भन्नाट ऑफर्स; या वस्तूंवर मिळतेय मोठी सवलत

Marathi News Live Updates : कोकणवासियांचा खोळंबा! मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा, प्रचंड वाहतूक कोंडी

Ganesh Chaturthi 2026 : यंदा गणराया 12 दिवसांसाठी मुक्कामी, नऊ वर्षांनी योग; हरितालिका-गणेश चतुर्थी एकाच दिवशी, उपवास कधी सोडायचा?

SCROLL FOR NEXT