liquor.jpg 
विदर्भ

अरेच्चा! हे चोर की दारुडे; असे काय झाले...वाचा

सकाळ वृत्तसेवा

चिखली (जि.बुलडाणा) : येथील आठवडी बाजारातील जैस्वाल यांचे देशी दारूचे दुकान अज्ञात चोरट्यांनी दुसऱ्यांदा फोडले असून, दुकानातील हजारोचा माल चोरट्यांनी लंपास केल्याची घटना ता.16 एप्रिल रोजी उघडकीस आली आहे.

याबाबत सविस्तर असे की, फिर्यादी संजय फुलाजी चव्हाण (वय 40) राहणार शेलूद ता. चिखली हा प्रिया संजय जयस्वाल यांच्या दुकानावर वीस वर्षांपासून काम करीत असून, आज ता. 16 रोजी तो व त्याचे सोबत अश्विन संजय जयस्वाल हे आठवडी बाजारातील दुकानावर चक्कर मारण्यासाठी गेले असता दिनेश शर्मा यांच्या दुकानाच्या बाजूने दुकानाचे पत्र्याची नट काढून टिनपत्रे वाकवलेले दिसून आले व दुकानात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. दुकान मालकांना याबाबत सूचना देऊन पाहणी केली असता 9 बॉक्स देशीदारू किंमत 23 हजार 400 (तेवीस हजार चारशे) रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार फिर्यादीने चिखली पोलिसात दिली आहे.

आवश्यक वाचा - बाळा मी लवकर येईल...

विशेष म्हणजे एकाच आठवड्यात जैस्वाल यांचे देशी दारूचे दुकान दोनदा चोरट्यांनी फोडले असून, दोन्ही वेळेस दुकान पाठीमागून फोडले आहे. शहरातील दारू दुकान व बार फुटीची पाचवी घटना आहे. यावरून चिखली पोलिसांनी कलम 461, 380 अन्वये गुन्हा दाखल केला असून पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गुलाबराव वाघ यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास चिखली पोलिस करीत आहे.

अनेक शंकाकुशंका
कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर संबंध देशासह सगळीकडे संचारबंदीचे वातावरण असून या लॉकडाउन दरम्यान सुद्धा तळीरामांना दारू कुठून उपलब्ध होते, हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. याप्रकारे देशी-विदेशी दारूच्या दुकानांमध्ये होत असलेल्या चोरीमुळे विविध शंका-कुशंकाना वाव निर्माण झाला आहे. लॉकडाउनमध्ये सर्वत्र कडक पोलिसांचा बंदोबस्त असतानासुद्धा दुकानांमध्ये चोरी होते कशी? या चोरीमध्ये लाखो रुपयांचा माल चोरून नेला जातो तर त्याठिकाणी वाहने येतात कुठून? जीवनावश्यक वस्तूंना सोडून दारूचे दुकानच कसे फुटते? या परिसरामध्ये तसेच दुकानांमध्ये सीसी कॅमेरे आहेत की नाही? असे अनेक प्रश्न निर्माण होतात हे विशेष.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT