See who did the first movement after the lockdown in buldana akola marathi news 
विदर्भ

Video: कुणी केले पहा लॉकडाउननंतर पहिले आंदोलन, वाचा काय होते कारण...

सकाळ वृत्तसेेवा

बुलडाणा :  कोरोना संसर्गामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व आंदोलने बंद झाली होती. मात्र, आज चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांनी मका खरेदीसाठी आंदोलन करून आंदोलनांचे लॉकडाऊन देखील ओपन केले आहे.
8 मे रोजीच्या शासन निर्णयाद्वारे मका खरेदी करण्यासाठी आदेश दिलेले असतांना बुलडाणा

जिल्ह्यात अजूनपर्यंत कुठेही मका खरेदी केंद्र सुरु करण्यात आलेले नाही. याबाबत प्रशासनाला पत्रव्यवहार करून ही मका खरेदी सुरु झाले नसल्याने आज 9 जून रोजी भाजपा आमदार श्वेता महाले यांनी बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालय समोर शेतकन्यांच्या हितासाठी ठियया आंदोलन करत शासनाचा निषेध नोंदविला आहे.

बुलडाणा जिल्ह्यात आतापर्यंत सहा हजाराच्या वर शेतकन्यांनी मका हमीभाव केंद्रात मका देण्यासाठी नोंदणी केलेली आहे. मका नोंदणीसाठी प्रत्येक तालुक्यामध्ये एकच सेंटर असल्याने जिल्हा भरात अनेक मका उत्पादक शेतकरी असतांना केवळ तालुक्याच्याच ठिकाणी नोंदणी होत असल्याने अनेक शेतकऱ्यांना नोंदणी पासून वंचित राहावे लागले आहे. शासनाने खरेदी केलेल्या तूर, हरभरा, कापूसाचे पैसे मिळालेले नाही. मका घरात असूनही शासन खरेदी करीत नाही आणि खुल्या बाजारात मकाला किंमत नाही. त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला दिलासा देण्याकरिता तातडीने हमीभावाने मका खरेदी करण्यात यावी.

शासनाने खरेदी केलेल्या कापूस, तूर, हरभरा याचे पैसे शेतकऱ्याच्या खात्यात जमा करा, पीककर्जाचे वाटप जलद गतीने करा, नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची राहिलेली तूर, हरभरा तात्काळ घेण्यात यावे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील आमदार श्वेता महाले यांनी देत शासकीय धोरणचा निषेध व्यक्त करत आपल्या मागणीचे निवेदन प्रशासनाला दिले आहे. या वेळी आंदोलनात भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"भारताच्या भविष्यासाठी!" टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलची पोस्ट; इरफान पठाणही म्हणतो, कोणत्याही 'पेपर लीक'मुळे...

Pune Treefall : स्वारगेट पोलिस लाइनमध्ये वडाचे प्रचंड झाड कोसळून १०-१५ दुचाकींचे नुकसान, २३ दिवसांत शहरात ३७२ झाडपडीच्या घटना

Pune Dry Waste Project: पुण्यात ३०० मेट्रिक टन सुका कचरा प्रकल्पाला स्थायीत बहुमताने मंजुरी; भाजप-काँग्रेस आमनेसामने

Sachin Tendulkar on Student Protest: "माझे वडील प्राध्यापक होते..."; सचिन तेंडुलकरची विद्यार्थ्यांसाठी भावनिक पोस्ट; म्हणाला, जेव्हा विद्यार्थ्यांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळत नाही...

Aadhaar Card Update: 'आधार कार्ड'मधून खरंच नाव आणि पत्ता गायब होणार? सत्य काय आहे? सरकारचं अधिकृत स्पष्टीकरण समोर

SCROLL FOR NEXT