विदर्भ

बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयातच झाली ‘जप्ती’ची कारवाई

सकाळ वृत्तसेवा

बुलढाणा ः तलावासाठी भूसंपादित केलेल्या जमिनीचे शेतकऱ्यांना मोबदला रक्कम न दिल्याने आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात जप्तीची कारवाई करण्यात आली.

देउळगावमही गाव तलावासाठी भूसंपादित केलेल्या जमिनीचे शेतकऱ्यांना मोबदला रक्कम न दिल्याने आज (ता.19) बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयातिल जिल्ह्याधिकारी उपस्थित नसल्याने कक्ष बाहेरच्या साहित्याची जपतिची कारवाई करण्यात आली. जप्ती मद्धे एक प्रिंटर्स,एक मॉनिटर एक सीपीयू व खुर्चीचा समावेश आहे.

 

गाव तलावासाठी भूसंपादित झालेल्या शेतकऱ्यांना मोबदला देण्याचे आदेश बुलढाणा जिल्हा न्यायालयाने दिले होते. त्यानंतर मोबदला न दिल्याने साहित्य जप्ती करण्यात आले. यामध्ये देउळगावमही येथील संतोष शिंगणे, रंगनाथ शिंगणे, शशिकला मधुकर शिंगणे, अरुण राघुजी शिंगणे,शेख यासीन शेख फतु या शेतकऱ्याची गाव तलावासाठी संपादित केली होती. या पाच शेतकऱ्याला 28 लाख रुपये मोबदला देण्याचा आदेश बुलढाणा न्यायालयाने काढला होते. त्यानंतर शेतकऱ्याला मोबदल्याची रक्कम मिळाली नाही.

ही रक्कम न दिल्याने न्यायालयाने जिल्हाधिकारी कार्यालयातील साहित्य जप्त करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शेतकऱ्यांचे वकील व बुलढाण्याचे बेलिफ यांनी शेतकऱ्यासोबत ही कार्रवाई केली आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT