Serious: Sex acts with a little girl made by the cousin of the ward member
Serious: Sex acts with a little girl made by the cousin of the ward member 
विदर्भ

गंभीर: नगरसेवकाच्या चुलत भावाने केले चिमुकलीशी अश्‍लील चाळे

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : पारडी ठाण्यांतर्गत पुनापूर मार्ग परिसरात एका व्यक्तीने घरात घुसून मुलीशी अश्‍लील चाळे केले. मुलीने आणि आईने आरडा-ओरड केल्यामुळे परिसरातील नागरिक गोळा झाले. अश्‍लील चाळे करणाऱ्या व्यक्तीला पकडून जबर चोप दिला. पोलिस ठाण्यात नेत असताना पोलिस घटनास्थळी पोहोचले. आरोपीची संतप्त जमावाच्या तावडीतून सुटका केली. विनयभंगाचा गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली.

जवाहर बाबुराव वैद्य (रा. पुनापूर, वय 40) असे आरोपीचे नाव आहे. तो एका नगरसेवकाचा चुलत भाऊ असल्याची माहिती आहे. आरोपी डेली कलेक्‍शनचे काम करतो. रविवारी रात्री तो परिसरात राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेच्या घरात घुसला.
आरोप आहे की, त्याने महिलेच्या मुलीशी अश्‍लील चाळे केले. पीडित मुलीच्या आईने त्याला रंगेहात पकडले आणि आरडा-ओरड सुरू केला. आवाज ऐकून परिसरातील नागरिक जमले. मुलीशी अश्‍लील चाळे केल्याचे समजताच नागरिक संतप्त झाले.

नागरिकांनी आरोपीला दिला चोप
लोकांनी जवाहरला पकडून चोप दिला. पाहता-पाहता शेकडे नागरिक जमले. काही लोकांनी जवाहरचे कपडेसुद्धा फाडले. नागरिक त्याला चोप देत ठाण्याच्या दिशेने निघाले. दरम्यान, कोणीतरी पोलिसांना सूचना दिली. तत्काळ पारडी पोलिस घटनास्थळावर पोहोचले. जवाहरची संतप्त नागरिकांच्या तावडीतून सुटका केली. त्याला ठाण्यात आणले असता संतप्त नागरिकही ठाण्यात पोहोचले.

कठोर कारवाई करण्याचे आश्वासन
दुय्यम निरीक्षक ज्योती राजशिर्के यांनी तत्काळ परिसरात पोहोचून नागरिकांना समजावले. कायदेशीररित्या कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यानंतर
नागरिकांचा राग शांत झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : राजस्थान क्वालिफाय करणार की हैदराबाद मजबूत स्थितीत पोहचणार?

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT