001.jpg 
विदर्भ

Video: पातूरच्या सात जणांनी कोरोनाला हरविले

सकाळ वृत्तसेवा

अकोला  ः पातूर येथील सात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना गुरुवारी (ता.23) सर्वोपचार रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. हे सातही रुग्ण झाले बरे झाले असून, पातूरच्या सातही रुग्णांनी कोरोनावर विजय मिळविला आहे. अकोलेकरांसाठी ही दिलासादायक बाब आहे. 

प्रशासनाने वाजविल्या टाळ्या
डिस्चार्ज देतेवेळी जिल्हाधिकारी जोतेंद्र पापळकर यांच्यासह वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरफडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, निवासी उप जिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे, एसडीएमम डॉ. नीलेश अपार यांच्यासह इतर डॉक्टर व अधिकारी यांनी टाळ्या वाजवून बरे झालेल्या रुगांचे स्वागत केले.

तीन जणांचे अहवाल पाॅझिटिव्हच
अकोल्यात आतापर्यंत 16 कोरोना रुग्ण आढळून आले होते. यापैकी पातूर येथील सात कोरोनाबाधित रुग्णांचे सर्वच्या सर्व अहवाल निगेटिव्ह आल्याने या रुग्णांना गुरूवारी डिस्चार्ज देण्यात आला. तर गुरुवारी दुपारी प्राप्त झालेल्या 21 अहवालापैकी 18 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर तीन जणांचे चौथ्या चाचणी अखेरही अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. दरम्यान आज दुपारी पातूर येथील सात जणांना पूर्ण उपचारानंतर बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने दिली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बँकांचा ३ दिवसांचा संप मागे! बैठकीनंतर रात्री उशिरा निर्णय; काय झाली चर्चा?

विश्रांतवाडीत ११ वर्षीय मुलीवर हातपाय बांधून अत्याचाराचे आरोप, ५२ वर्षांच्या नराधमाला अटक; रस्ता रोको आंदोलन

Divya Shinde Arrest : बिग बॉस मराठी फेम अभिनेत्रीची पोलीस कोठडीत रवानगी, डॉक्टरसोबत का झालेला वाद?

Virat Kohli Records: विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड; जगात असा पराक्रम कुणी केला नव्हता, गावस्करांच्या विक्रमाशीही बरोबरी

Pune Crime: गणेश विसर्जन मिरवणुकीतील गर्दीत चोरट्यांचा डल्ला; पुण्यात १४ घटनांत ९.७७ लाखांचे दागिने लंपास

SCROLL FOR NEXT