corona 
विदर्भ

चंद्रपूर जिल्ह्यात चोवीस तासांत सात कोरोना बाधित, राज्य राखीव दलाच्या तीन जवानांचाही समावेश

सकाळ वृत्तसेवा

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत एकूण सात पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये 3 राज्य राखीव पोलिस दलाचे जवान ( एसआरपीएफ ) आहेत. ते पुणे येथील मूळ निवासी आहेत. त्यामुळे त्यांची चंद्रपूरच्या बाधितांमध्ये गणना होणार नाही.

त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह असला तरी कोणतीही लक्षणे नाहीत. त्यांची प्रकृती स्थिर असून उपचार सुरू आहेत. हे तिघे वगळता चंद्रपूर जिल्ह्यातील रविवारी 121 वर असणारी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढून सोमवारी 125 झाली आहे. आतापर्यंत 62 बाधित कोरोनामुक्त झाले आहे. तर सध्या उपचार घेत असलेल्या संक्रमितांची संख्या 63 आहे.

आरोग्य यंत्रणेच्या माहितीनुसार, पुणे येथील रहिवासी असलेल्या आणि संस्थात्मक विलगीकरणात असलेल्या 23, 53 व 23 वयाच्या तीन जवानांचे रविवारी घेण्यात आलेले स्वॅब पॉझिटिव्ह आले आहेत. हे सर्व पुणे येथून आले होते. एक जुलैला एकाच ठिकाणी हे तीनही जवान संस्थात्मक विलगीकरणात होते. सोमवारी दिवसभरात चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 4 रुग्ण पॉझिटिव्ह निघाले आहेत.
यामध्ये नागपूरच्या कामठी परिसरातून 26 जून रोजी परत आलेल्या 27 वर्षीय ऊर्जानगर येथील रहिवासी असणाऱ्या व्यक्तीचा स्वॅब सोमवारी पॉझिटिव्ह आला आहे. याशिवाय पडोली येथील एमआयडीसीत काम करणाऱ्या 36 वर्षीय नागरिकाचा स्वॅबदेखील पॉझिटिव्ह आला आहे. या व्यक्तीने दोन ठिकाणी खासगी इस्पितळात ताप आल्यामुळे तपासणी केली होती. तत्पूर्वी सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास आलेल्या 2 बाधितांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील संस्थात्मक विलगीकरणात असणाऱ्या भिवापूर वॉर्ड परिसरातील 30 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
हैदराबाद शहरातून ही महिला चंद्रपूरमध्ये आली होती. काल त्यांचा स्वॅब घेण्यात आला. आज तो पॉझिटिव्ह आला आहे. दुसरा बाधित हा करंजी येथील पॉझिटिव्ह बाधितांच्या संपर्कातील आहे. पोंभुर्णा तालुक्‍यातील मोहळा येथील 21 वर्षीय तरुण संस्थात्मक विलगीकरणात होता. सोमवारी स्वॅब घेण्यात आल्यानंतर आज तो पॉझिटिव्ह ठरला आहे.

हेही वाचा - कोरोना काळात वाढल्या आहेत सामाजिक-मानसिक समस्या!

आतापर्यंत 62 बाधित बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे 125 पैकी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या आता 63 झाली आहे. सर्व बाधितांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT