विदर्भ

बेलतरोडी देहव्यापाराचे "हब'

अनिल कांबळे

बेलतरोडी देहव्यापाराचे "हब'
नागपूर : गुन्हे शाखेचा सामाजिक सुरक्षा विभाग व काही ठाणेदारांच्या आशीर्वादाने शहरात धडाक्‍यात देहव्यापार सुरू आहे. बेलतरोडी, मनीषनगर, अजनी, हुडकेश्‍वर, सीताबर्डी, धंतोली, शंकरनगर व अंबाझरी हे परिसर देहव्यापाराचे "हब' बनले आहेत. काश्‍मीरसह अन्य राज्यांतील जवळपास 800 पेक्षा जास्त तरुणी "मसाज' सेवा देण्यासाठी सज्ज असल्याची माहिती देहव्यापाराशी संबंधित सूत्रांनी दिली.
वर्षभरापासून शहरातील देहव्यापार चांगलाच फोफावला होता. उपराजधानीला "सेक्‍स रॅकेट' हब अशी नवी ओळख निर्माण झाली होती. मात्र, "सकाळ'ने "देहव्यापाराची दलदल' ही वृत्तमालिका प्रकाशित करताच देहव्यापाराच्या अड्ड्यांवर पोलिस छापे घालून विदेशी तरुणींना ताब्यात घेत आहेत. बेलतरोडी नवी वस्ती असल्यामुळे सेक्‍स रॅकेटचे मोठे प्रस्थ निर्माण झाले आहे. डीबी पथकाच्या परवानगीने मोठमोठ्या इमारतींत "सेक्‍स रॅकेट' खुलेआम सुरू आहेत. हुडकेश्‍वरमधील प्रणिता जयस्वाल, सचिन सोनारकर, मीनाक्षी यांचे अनेक पोलिस अधिकाऱ्यांशी संबंध असल्यामुळे बिनधास्त "ऑनलाइन एस्कॉर्ट सर्व्हिस' सुरू होती.
पोलिस कारवाईची भीती नसल्याचे सांगून आंबटशौकिनांना तरुणी पुरविण्यात येत आहेत. प्रणिता जयस्वालने पुणे-मुंबईच्या मुलींना ब्यूटी पार्लरमधील देहव्यापारात पार्टनरशिप देऊन लाखोंचा व्यवसाय केला. सचिन सोनारकरने रशिया, उज्बेकिस्तान, इंग्लंड, थायलंड व पाकिस्तानच्या तरुणींना उपराजधानीत देहव्यापारासाठी रस्ते खुले केले. आज पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिक, अमरावती या शहरांत विदेशी मुली पोहोचविण्याचे काम सुरू आहे.
तरुणी पुन्हा देहव्यापारात
पोलिसांनी छापा घातल्यानंतर देहव्यापार करणाऱ्या मुलींना पीडित म्हणून ताब्यात घेण्यात येते. महिला सुधारगृहात पाठविण्याची भीती दाखवून लाखोंमध्ये "सेटिंग' केली जाते. त्यामुळे त्याच त्या तरुणी देहव्यापारात पोलिसांना सापडतात. छापा घातल्यानंतर केवळ महिनाभर व्यवसाय बंद केला जातो. त्यानंतर पुन्हा दुसऱ्या ब्यूटी पार्लर किंवा मसाज सेंटरमध्ये तरुणी परत येतात.
थायलंडच्या तरुणींची सेवा
शहरातील नॅचरोपॅथी सेंटर तसेच स्पा ऍण्ड मसाज पार्लरमध्ये थायलंड, मणिपूर, आसाम, त्रिपुरा, नागालंड येथील तरुणींची संख्या जास्त आहे. थायलंडच्या तरुणींना विशेष पसंती असून, आंबटशौकीन 10 ते 25 हजारांपर्यंत पैसे मोजत आहेत. अनेक स्पा-ब्यूटी पार्लरमध्ये मसाजच्या नावावर देहव्यापार सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT