Rape
Rape 
विदर्भ

सात वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार

सकाळवृत्तसेवा

नागपूर - घरासमोर खेळत असलेल्या सातवर्षीय चिमुकलीवर शेजारी राहणाऱ्या विवाहित युवकाने लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी मुलीच्या आईच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. संतोष मरसकोल्हे (वय ३०, नाका नंबर २) असे आरोपीचे नाव आहे. 

पीडित ७ वर्षीय मुलगी मुस्कान (बदललेले नाव) मंगळवारी दुपारी चार वाजता घरासमोर खेळत होती. दरम्यान, विकृत प्रवृत्तीचा आरोपी संतोषने चॉकलेटसाठी दहा रुपये देण्याचे आमिष मुस्कानला दाखवले. त्यामुळे ती त्याच्या मागोमाग गेली. त्याने तिला घरात नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. चिमुकली रडत असतानाच तिचा मामा घरी आला. त्यावेळी आरोपी आणि भाचीला अर्धनग्न बघताच त्याने बाजूला पडलेली काठी घेतली आणि आरोपीची चांगली धुलाई केली. आरडाओरडा झाल्यामुळे शेजारी गोळा झाले. त्यांनी जरीपटका पोलिसांना फोन केला. तक्रारीवरून गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली. संतोषचे दोन वर्षांपूर्वीच लग्न झाले असून तो पत्नीसह भाड्याने राहतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK : जडेजाची अष्टपैलू कामगिरी, चेन्नईचा पंजाबवर विजय

Rohit Pawar Video : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT