File photo
File photo 
विदर्भ

आमसभेवर आचारसंहितेची छाया

सकाळ वृत्तसेवा

अमरावती :  महापालिकेच्या शुक्रवारी होणाऱ्या (ता. 20) मासिक आमसभेवर विधानसभा आचारसंहितेची गडद छाया आहे. राज्य निवडणूक आयोगाने कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होण्याची शक्‍यता वर्तविल्याने आमसभा अडचणीत येण्याची संभावना बळावली आहे. गुरुवारी झालेल्या प्री-मिटिंगमध्ये वेट ऍण्ड वॉचचा निर्णय घेण्यात येऊन प्रत्यक्ष घोषणेनंतरच आमसभा स्थगित करण्याचे निश्‍चित करण्यात आले.
महापालिकेची सप्टेंबर महिन्यातील आमसभा शुक्रवारी (ता.20) आयोजित करण्यात आली आहे. या महासभेत प्रशासनाकडून सहा प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. त्यामध्ये सर्व्हिस गल्लीतील खुली जागा भाडेतत्त्वावर देणे, मल्टी युटिलिटी वाहन खरेदी प्रकरणातील चौकशी अहवालावर कारवाईसंदर्भातील निर्देश, अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेतील 1 कोटी 65 लाख रुपये खर्चाच्या कामांना मंजुरी घेणे, मनपा हद्दीतील तथा प्रशासकीय नळजोडणीच्या पाणी आकारणीची थकबाकी, शहरी आरोग्यकेंद्राचे स्थानांतरण, प्रारूप विकास योजना शासनास मंजुरीस्तव सादर करण्यासाठी मुदतवाढीची मागणी या प्रस्तावांचा समावेश आहे.
गुरुवारी (ता.19) महापौरांच्या अध्यक्षतेत झालेल्या गटनेते व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या प्री-मिटिंगमध्ये आचारसंहिता लागू होण्याची प्रतीक्षा करण्याचा निर्णय झाला. प्रत्यक्ष घोषणा झाल्यानंतरच आमसभा पुढे सुरू ठेवायची की औपचारिक करायची याचा निर्णय वेळेवर घेण्यात येणार आहे.
दरम्यान, महापालिकेत तूर्त आचारसंहिता हाच मुद्दा चर्चेला आहे. आचारसंहिता लागू झाल्यास महासभेला धोरणात्मक निर्णय करता येणार नाहीत. सदस्यांनी 42 प्रस्ताव मांडेल आहेत. पुढील महिन्यात विधानसभेच्या निवडणुका आहेत. दिवाळीपूर्वी या निवडणुका होण्याची शक्‍यता असून त्यासाठी कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होण्याची शक्‍यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT