Prakash Ambedkar 
विदर्भ

Prakash Ambedkar: प्रकाश आंबेडकरांना 'इंडिया' आघाडीत घेण्यासाठी शरद पवारांचा हिरवा झेंडा! म्हणाले...

Sandip Kapde

Prakash Ambedkar: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज अकोल्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी इंडिया आघाडीत घेण्याबाबत प्रतिक्रिया दिली. तसेच आतापर्यंत प्रकाश आंबेडक यांना इंडिया आघाडीत का घेतलं नाही?, यावर देखील पवारांनी भाष्य केले.

शरद पवार म्हणाले, उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची चर्चा झाली आहे. मात्र समान कार्यक्रमावर भाजपविरोधातील ज्या शक्ती एकत्र येऊ शकतील. यामध्ये यापूर्वी काय झालं याचा विचार न करता त्यांना सहभागी करावं, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे धोरण आहे.

मात्र प्रकाश आंबेडकर यांना इंडिया आघाडीत घेण्यासाठी मी एकटा निर्णय घेऊ शकत नाही. बाकीच्या लोकांना देखील विश्वासात घ्यावे लागेल, असे पवार म्हणाले.

प्रकाश आंबेडकर यांना इंडिया आघाडीत घेण्यासाठी उशीर का होतोय, यावर शरद पवार म्हणाले, आमची बैठक झाली नाही. इंडियाची बैठक होणार आहे. मुंबईला बैठक झाली त्यानंतर नागपूर किंवा इतर कुठं बैठक होणार, याबाबत आमची चर्चा सुरु आहे.

प्रकाश आंबेडकर आरोप करतात पण ते आमच्यासाठी नवीन नाही. त्यांना सोबत घेण्यासाठी इंडिया आघाडी निर्णय घेईल, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Smart Meter Camera: 'महावितरण'च्या स्मार्ट मीटरमध्ये खरंच कॅमेरा आहे का? वीज वितरण कंपनीकडून स्पष्टीकरण

Latur Police Raid: वाढवणा पोलिसांची तिर्रट जुगार अड्ड्यावर धाड; २३.३५ लाखांचा मुद्देमाल जप्त, ८ जणांविरुद्ध गुन्हा

Inter-State Robbery Gang: ओतूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; दरोड्याच्या तयारीतील आंतरराज्यीय टोळी जेरबंद

Pune News : सासरच्या मंडळींकडून जावयांना मारहाण; एकाचे नाकाचे हाड मोडले, तर दुसऱ्याला बॅटने झोडपले!

Dnyaneshwar Wakade case: बीडमध्ये भररस्त्यात थरार! ज्ञानेश्वरवर दगड, विटा ,चाकूने वार! नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT