Accident 
विदर्भ

वडिलांसोबत जात होती केंद्रावर पण मृत्यूनेच घेतली परीक्षा

सकाळ वृत्तसेवा

शेंबाळपिंपरी (जि. यवतमाळ) : वडिलांसोबत दुचाकीवर बसून ती 12 वीचा पेपर देण्यासाठी जात होती. त्यांची गाडी शेंबाळपिंपरी-पुसद मार्गावरील आमदरी वळणावरून जात असताना अचानक काळ बनून आलेल्या एका भरधाव ट्रकने दुचाकीला धक्का दिला आणि ती खाली पडून ट्रकच्या चाकाखाली आली. यातच तिचा वडिलांच्या डोळ्यांदेखत मृत्यू झाला. हृदयाला पिळवटून टाकणारी ही घटना गुरुवारी (ता.6) सकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली. 

...अन्‌ आला काळ आडवा

आदिती बाळासाहेब देशमुख (वय 18) असे या घटनेत मृत्यू झालेल्या दुर्दैवी तरुणीचे नाव आहे. भांबरखेडा येथील रहिवासी व शेंबाळपिंपरीतील वैद्यकीय व्यावसायिक डॉ. बाळासाहेब देशमुख यांची आदिती ही मुलगी. गुरुवारी (ता.6) तिचा 12 वीचा पेपर होता. त्यामुळे वडील डॉ. देशमुख तिला घेऊन गुंज येथील परीक्षा केंद्रावर पेपर सोडण्यासाठी एम.एच.29 -2156 क्रमांकाच्या दुचाकीवर जात होते. आमदरी वळणावरून ते जात असताना अचानक अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धक्का दिला. यात आदिती दुचाकीवरून पडून वाहनाच्या चाकाखाली आली. यातच तिचा जागीच मृत्यू झाला. सुदैवाने वडील डॉ. देशमुख यांना कुठलीही इजा झाली नाही. घटनेनंतर वाहनासह चालक पसार झाला. या घटनेची नोंद खंडाळा पोलिसांनी केली अधिक तपास करीत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्याला यलो अलर्ट, मध्य महाराष्ट्रासह ५ जिल्ह्यात पावसाची शक्यता; हवामान विभागाचा इशारा

Banned : पाकिस्तानी खेळाडूची मस्ती उतरवली, दोन सामन्यांची बंदी; गुपचूप चिटींग करायला गेला अन् 'कॅमेरामन'ने करेक्ट कार्यक्रम केला

"विशालने आता हद्द पार केली" राकेशचं कुटूंब बिग बॉसमधील भांडणावरून संतापले; अन्याय म्हणत केली कारवाईची मागणी

Baglan Crop Damage: बागलाणमध्ये १४ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान; पंचनामे व सरसकट नुकसान भरपाईची मागणी करत दीपिका चव्हाण आक्रमक

महाराणी ताराराणी जैन समुदायाच्या, जैन मुनी नयन पद्मसागर यांचं विधान

SCROLL FOR NEXT