shegaon palakhi road.jpg 
विदर्भ

शेगाव पालखी मार्ग अर्धवट; ठेकेदाराने गुंडाळला गाशा

सकाळ वृत्तसेवा

शेगाव (जि.बुलडाणा) : शेगाव ते पंढरपूर या संत गजानन महाराज पायीवारी पालखी मार्गाचे रुंदीकरणाचे काम शेगाव-अकोला मार्गावर गेल्या वर्षीपासून सुरू होते. परंतु गेल्या महिनाभरापासून ठेकेदाराने शेगाव नागझरी रोडवरील गाशा गुंडाळल्याचे चित्र समोर आले आहे.

शेगाव-नागझरी या बुलडाणा जिल्ह्यातील टोकाच्या दोन तिर्थक्षेत्राला जोडणारा आणि अकोला जिल्ह्यात केवळ 35 कि. मी. लांबीच्या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम मागच्या सरकारच्या काळात जोरात सुरू झाले होते. झाडे कटाई रस्ता रुंदीकरण, पुल विकास, नाली बांधकाम असे काम वेगाने सुरू होते. त्यामुळे जवळपास पाच ते सहा किमी पर्यतचा एका बाजुचा शेताकडील रस्ता पाच फुट खोदुन किंवा अर्धवट नाली बांधून ठेवला आहे.

ठेकेदार गेला; साहित्यही नेले
गेल्या काही महिन्यापासून हे बांधकाम अर्धवट सोडून ठेकेदार गेला आहे. सर्व वाहन साहित्य, बांधकाम मटेरीयल उचलून नेले. काही ठिकाणी सब ठेकेदाराचे रोजंदारीवरील मजूर राखणं ठेवले असून, त्यांना बंद कामाची कोणतीच माहिती नाही. आम्हीच रोजगाराची वाट पाहत आहोत असे ते म्हणतात, पैशा अभावी काम बंद झाल्याची चर्चा शेतकरी करतात. सरकार बदल्यामुळे चालु काम बंद पडले असेही बोलल्या जाते. हे काम अकोल्यापर्यंत आहे. पण पुढची माहिती कोणालाच नाही. 

खोदकामामुळे शेतकऱ्यांची पार दैना
शेतकऱ्यांची मात्र पार दैना करून गेले आहे. रस्त्याचे बाजुला पाच, सहा फुटाची नाली खोदुन काही ठिकाणी बांधकाम अर्धवट अवस्थेत ठेवल्यामुळे शेतकऱ्यांचा शेतात जाण्या-येण्याचा रस्ता बंद झाला आहे. परंतु कोणीही याची जबाबदारी घेण्यास तयार नाही. येत्या काही दिवसांत तूर, कापूस पीकांची वाहतूक शेतकऱ्याना करायची आहे. ती कशी करणार शेतकऱ्यांचे कैवारी असलेले सरकारने त्वरीत लक्ष द्यावे, मागणी हे शेतकरी करत आहेत. तसेच बांधकामाच्या क्वालिटीकडे लक्ष देण्याची गरज आहे अशीही मागणी होत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भूकच गेली! मुंबईत प्रसिद्ध फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये जेवणाच्या टेबलवर झुरळ, डॉक्टरने VIDEO शेअर करत तुकाराम मुंढेंना केलं टॅग

Palghar News : गणेश विसर्जनावेळी पालघरच्या सूर्या नदीत दुर्घटना; १७ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू, तिघांना वाचवण्यात यश

Jintur Agitation : जिंतूरात बंजारा आंदोलनाला हिंसक वळण; उपोषणकर्ते विनोद आडे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड, रास्ता रोकोने शहरात खळबळ

Marathi News Live Updates: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, ५ दिवस पावसाचा अंदाज

Nirgudsar News : कृषीपंपांच्या केबलवर चोरट्यांचा डल्ला

SCROLL FOR NEXT