Shiv Sena sub-city chief killed in accident 
विदर्भ

शिवसेना उपशहर प्रमुख पत्नीसह अपघातात ठार 

सकाळ वृत्तसेवा

दर्यापूर (जि.अमरावती) : दर्यापूर ते अकोला रोडवरील तोंगलाबाद-सौंदळी फाट्याजवळ २१ डिसेंबर रोजी रात्री ११ ते १२ वाजेदरम्यान चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात पती-पत्नी जागीच ठार झाले, तर मुलगा गंभीर जखमी आहे.

दर्यापूर शहरातील दिलीप एजन्सीचे संचालक तथा शिवसेना उपशहर प्रमुख विजय खंडारे (वय ४२), त्यांची पत्नी वृषाली खंडारे (वय ३६) व मुलगा सुयश (वय ९) हे रात्री नातेवाइकाकडे जाण्यासाठी आपल्या कारने निघाले असता अचानक समोरून येणा-या ट्रकने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली.

अपघात एवढा भीषण होता की त्यांची कार अक्षरशः चकनाचुर झाली. रात्रीची वेळ असल्याने त्या धडकेचा आवाज टोंगलाबाद-सौंदळी गावापर्यंत पोहोचला. गावातील नागरिक तत्काळ धावले. जखमी अवस्थेत असलेल्या शिवसेना उपशहर प्रमुख विजय खंडारे (वय ४२), त्यांची पत्नी वृषाली खंडारे (वय ३६) व मुलगा सुयश (वय ९) यांना रात्रीच अकोला येथील खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले.

मात्र विजय खंडारे व वृषाली खंडारे या पती-पत्नीला मृत घोषित करण्यात आले. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Marathi News Live Updates : मध्य प्रदेशातील सांवर येथे भिंत कोसळून चार महिलांचा मृत्यू, पाच जण जखमी

Otur News : जुन्नर तालुक्यात प्रस्तावित कल्याण–लातूर जनकल्याण महामार्गाला तीव्र विरोध; शेतकरी आक्रमक, धरणे आंदोलनाला सुरुवात

SCROLL FOR NEXT