shivsena agitation against fuel increase rate in yavatmal
shivsena agitation against fuel increase rate in yavatmal  
विदर्भ

पेट्रोल, डिझेलसह गॅस दरवाढीविरोधात शिवसेना आक्रमक, यवतमाळमध्ये मोर्चा

राजकुमार भितकर

यवतमाळ : पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या दरवाढीमुळे सामान्य जनता त्रस्त झाली आहे. नुकत्याच जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गोरगरीब जनतेचा विश्‍वासघात केला आहे. केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस महागला आहे. या वाढीला केंद्र सरकार जबाबदार असून सामान्य जनतेच्या भावना केंद्र सरकारपर्यंत पोहोचण्यासाठी शिवसेनेने शनिवारी जिल्ह्याभर निषेध आंदोलन केले.

स्थानिक तहसील ऑफिस ते दत्त चौक दरम्यान शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पराग पिंगळे व राजेंद्र गायकवाड यांच्या नेतृत्वात निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात केंद्र शासनाच्या विरोधात घोषणा देऊन निषेध करण्यात आला. मोर्चाचा समारोप स्थानिक दत्त चौकात झाला. याप्रसंगी बोलताना जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड म्हणाले की, मोदी सरकार हे सामान्य जनतेच्या विरोधात असल्याने येत्या काळात हे सरकार उलथवून टाकले पाहिजे. तसेच महिलांनीदेखील घरगुती गॅसचे भाव वाढवणार्‍या सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरून केंद्र सरकारला त्यांची जागा दाखवून द्यावी, असे आवाहन केले. याप्रसंगी जिल्हाप्रमुख पराग पिंगळे, उमरखेड विधानसभा सहसंपर्क प्रमुख व जिल्हा परिषद सदस्य चितांगराव कदम, उपजिल्हा प्रमुख किशोर इंगळे, महिला आघाडी जिल्हा समन्वयक सागर पुरी, दिग्रस शहर शिवसेना उपशहरप्रमुख संदीप रत्नपारखी यांनी उपस्थितांना संबोधित केले. या आंदोलनात अ‍ॅड बळीराम मुटकुळे, सतीश नाईक, विकास जामकर, उत्तम मामा ठवकर, मनोज सिंगी, मनोज नाल्हे आदी उपस्थित होते.

भाजपच्या कथनी व करणीत फरक : पराग पिंगळे
शिवसेना पक्ष हा सामान्य जमतेच्या व्यथा जाणणारा पक्ष आहे. जनतेची गळचेपी झाल्यास शिवसेना कधीही रस्त्यावर उतरायला मागेपुढे पाहत नाही. 2014 साली आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती आकाशाला भिडल्या असताना पेट्रोल, डिझेलचे भाव वाढले, असा आकांडतांडव करणारे भाजप पदाधिकारी आज केंद्रात मंत्री आहेत. आज आंतरराष्ट्रीय बाजारात या किमती निम्यापेक्षा कमी झाल्या असतानासुद्धा भरमसाठ टॅक्सेस लावून भाववाढ होत असताना याच मंत्र्यांनी आता चुप्पी साधली आहे. भाजप पदाधिकार्‍यांच्या कथनी आणि करणीत फरक आहे, असे मत शिवसेना जिल्हाप्रमुख पराग पिंगळे यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

RCB Playoffs Scenario : चाहत्यांनो नाराज होऊ नका! RCB प्लेऑफमध्ये पोहोचणार, मुंबईनंतर गुजरातचाही खेळ जवळपास खल्लास

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

SCROLL FOR NEXT