विदर्भ

मुख्यमंत्रीपदावरून रामदास आठवलेंचा सेनेला सल्ला; म्हणाले...

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : शिवसेनेला स्वतःचे अस्तित्व टिकवायचे असेल तर त्यांनी महाविकासआघाडीतून बाहेर पडावे. भाजपसोबत युती करून अडीच वर्षांचा मुख्यमंत्रिपदाचा काळ भोगून उर्वरित अडीच वर्ष देवेंद्र फडणवीस यांना द्यावा, असा सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे. रिपाई (आठवले) गटाचे स्थानिक दिवंगत नेते कृष्णा गणवीर, गजानन वानखडे, आंबेडकरी चळवळीतील साहित्यिक प्रा. सत्तेश्वर मोरे व माजी आमदार स्व. अनिल गोंडाणे यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमासाठी ते अमरावतीस आले होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ना. आठवले म्हणाले, शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत आघाडी करून स्वतःचे नुकसान करून घेतले आहे. आघाडीमध्ये खूप भांडण असून कुरघोडीचे राजकारण आहे. त्यामुळे हे सरकार किती वर्षे टिकेल याचा नेम नाही. शिवसेनेचे अस्तित्व त्यामुळे धोक्यात आले असून त्यांना अस्तित्व टिकवायचे असेल तर महाविकासआघाडीतून बाहेर पडले पाहिजे.

नाहीतर आगामी निवडणुकीत सेनेचे नुकसान होईल. यासंदर्भात संजय राऊत यांच्यासोबत बोललो आहे. देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांच्याशीही चर्चा करणार आहे. अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा फार्मुलाही त्यांनी मांडला व तत्काळ युती करून उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षांचा कालावधी पूर्ण करून उर्वरित अडीच वर्ष देवेंद्र फडणवीस यांना द्यावे, अशी आपली भूमिका असल्याचे ते म्हणाले.

संसदेच्या अधिवेशनात मराठा आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे नमूद करीत ते म्हणाले, महाविकासआघाडीने मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण करावी. पेट्रोल डिझेलची भाववाढ, उज्वला गॅस, शेतकरी आंदोलन, मराठा आरक्षण अशा मुद्यांवर केंद्र सरकारचा त्यांनी बचाव केला. दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनासंदर्भात विचारले असता या कायद्यामध्ये दुरुस्ती करता येऊ शकेल, मात्र रद्द करण्याचा आग्रह शेतकऱ्यांनी सोडून द्यावा असे आवाहन त्यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Rare Earth Discovery : विदर्भाचं भाग्य उजळणार! 'वेकोलि'च्या खाणीत सापडला मौल्यवान खनिजांचा साठा; पाहा कोणत्या 6 खाणी आहेत या यादीत

Bank Holiday : आजपासून सलग 5 दिवस बँका राहणार बंद! तुमच्या शहरातील सुट्ट्या कधी ते पाहा

Latest Marathi News Live Update : होळीच्या पार्श्वभूमीवर 280 जण तडीपार; पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई

Pradosh vrat 2026: यंदा त्रयोदशीला महादेवाच्या आवडत्या फुलाशी संबंधित 'हा' उपाय करा, धनाचे सर्व दरवाजे उघडतील

Kolhapur Airpot : कोल्हापूर-दिल्ली विमानसेवा एक एप्रिलपासून; वाढत्या प्रवासी संख्येमुळे विमानतळ विस्ताराला गती

SCROLL FOR NEXT