Shivsena
Shivsena 
विदर्भ

शिवसेनेला राज्यसभेचे उपसभापतिपद?

मृणालिनी नानिवडेकर

नागपूर - शिवसेनेची नाराजी घालविण्यासाठी भाजपने राज्यसभेचे उपसभापतिपद देण्याची तयारी दाखवली असल्याचे समजते. बदललेल्या परिस्थितीत "हर एक फ्रेंड जरुरी होता है' हे लक्षात आलेल्या भाजपने 18 जुलैपासून सुरू होणाऱ्या संसद अधिवेशनापूर्वी यासंदर्भात शिवसेनेशी संपर्क साधल्याचे सांगण्यात येते.

विश्‍वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या महाराष्ट्रातील निकटवर्तीयांनी शिवसेनेची समजूत घालण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. महाराष्ट्राच्या विधान परिषदेतले बदललेले सत्तासमीकरण लक्षात घेता आगामी काही महिन्यांतच विधान परिषदेचे उपसभापतिपदही शिवसेनेला देण्याची तयारी या नेत्याने दर्शवली असल्याचे समजते.

सांगली महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस हे दोन्ही पक्ष एकत्र आले असून, विरोधकांच्या या ऐक्‍याची ही सुरवात असल्याचे पश्‍चिम महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी अमित शहा यांना कळवले आहे. अशा परिस्थितीत शिवसेनेला बरोबर घेणे अत्यावश्‍यक असल्याचेही सांगण्यात आले. नाणार प्रकल्पावरून नाराज असलेल्या शिवसेनेची समजूत काढण्याच्या दिशेने पावले उचलताना त्यांना राज्यसभेतील उपसभापतिपद देण्यासंबंधी चर्चा सुरू झाली आहे. प्रा. कुरियन उपसभापतिपदावरून निवृत्त झाले, त्या वेळीही शिवसेनेला हा प्रस्ताव पाठविला गेला होता. दोन दिवसांपूर्वी नव्याने या विषयावर शिवसेनेला निरोप पाठविण्यात आल्याचे भाजपच्या सूत्रांनी सांगितले.

विधान परिषदेतही भाजपचा सभापती आणि शिवसेनेचा उपसभापती असे समीकरण प्रत्यक्षात आणले जाऊ शकते, असेही सूचविण्यात आले. मात्र, शिवसेनेने अद्याप या दोन्ही प्रस्तावांसंदर्भात कोणताही निर्णय घेतला नसल्याचे समजते.

राजकारणात असे प्रस्ताव येतच असतात. या संदर्भातील निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच घेऊ शकतात.
- संजय राऊत, शिवसेना खासदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pension Department: पेन्शनधारकांना सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

Latest Marathi News Live Update: सलमान खान गोळीबार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल; सीबीआय तपासाची केली मागणी

Indian Navy : अरबी समुद्रात पुन्हा भारतीय नौदलाची हवा, 20 पाकिस्तानींसाठी ठरले देवदूत

Bhushan Pradhan: 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात पडलाय भूषण प्रधान? व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, "लवकर लग्न करा!"

Virat Kohli : 'खूप फसवणूक झाली मात्र आता...' विराट कसा झाला 634 कोटी रूपयाचा मालक?

SCROLL FOR NEXT