Shivsena Uddhav Thackeray  Esakal
विदर्भ

Shivsena Uddhav Thackeray : चंद्रपूर हादरलं! ठाकरेंच्या युवासेना शहर प्रमुखाची निर्घृण हत्या, सपासप वार अन्...

Shivsena Uddhav Thackeray : चंद्रपुरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. चंद्रपुरात ठाकरे गटाच्या युवासेना शहर प्रमुखाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

चंद्रपुरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. चंद्रपुरात ठाकरे गटाच्या युवासेना शहर प्रमुखाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अज्ञातांनी युवासेना शहर प्रमुख शिवा वझरकर याची हत्या करण्यात आली आहे. संबंधित घटना ही चंद्रपुरातील सरकारनगर परिसरात घडली आहे. 30 वर्षीय शिवा वझरकर याचा मृतदेह त्यांच्याच एका मित्राच्या कार्यालयाजवळच आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

युवासेना शहर प्रमुख शिवा वझरकर यांच्या हत्येनंतर समर्थकांनी संशयित आरोपीच्या जेसीबी आणि इतर वाहनांची तोडफोड केली. पोलीस विभाग प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हाय अलर्टवर असतानाच घडलेल्या या घटनेनंतर शहरातील पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे.

हत्येच्या घटनेनंतर वरीष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. वझरकर याचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयातील शव चिकित्सा कक्षात पाठवण्यात आला आहे.

या घटनेनंतर उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले होते. वादाचे रुपांतर हत्येत झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. संशयीत आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी ठाकरे गटाकडून केली जात आहे. परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे.

युवासेना शहरप्रमुख शिवा वझरकर हत्या प्रकरणात पोलिसांनी राजकीय पक्षातील माजी पदाधिकारी व सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्यांच्या मुलाला अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT