Sharad Pawar Ajit Pawar Mharashtra Politics Sakal
विदर्भ

Gondia News : गोंदियात अजित पवार गटाला धक्का; माजी खासदार शरद पवार गटात

गोंदिया जिल्ह्यातील अजित पवार गट आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांना मोठा धक्का.

सकाळ वृत्तसेवा

गोंदिया - जिल्ह्यातील अजित पवार गट आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांना मोठा धक्का बसला असून अजित पवार गटाचे माजी खासदार खुशालचंद्र बोपचे आणि त्यांचे पूत्र रविकांत बोपचे यांनी शरद पवार प्रवेश केला आहे.

बोपचे यांनी बुधवारी मुबंईत शरद पवार यांची भेट घेत त्यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या पक्ष प्रवेशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार डॉ. राजेश टोपे उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पडल्यानंतर अजित पवार गटासोबत राहिलेले माजी खासदार खुशालचंद्र बोपचे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची मुबंईत भेट घेत त्यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. तसेच त्यांचे पूत्र युवा नेते रविकांत बोपचे यांनी सुद्धा शरद पवार गटात प्रवेश केला आहे.

बोपचे पितापुत्रांनी शरद पवार गटात प्रवेश केल्यामुळे जिल्ह्यात अजित पवार गटाला हादरा बसला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed OBC Melava: ओबीसी मेळाव्याला पंकजा मुंडे अनुपस्थित; स्टेजवर येताच भुजबळांनी शेरोशायरीतून सुनावलं

Virat Kohli, रोहित शर्मा २०२७ चा वर्ल्ड कप खेळतील का? अजित आगरकरचं मोठं विधान; म्हणाला, या दौऱ्यावर ते चांगले नाही खेळले तर...

रो-रो प्रकल्पाला नवी चालना मिळणार! कोकणातील आणखी तीन स्थानकांवर रो-रो फेरी थांबणार, पण कोणत्या?

Train Blanket: ट्रेनमधील घाणेरड्या चादरींची समस्या दूर झाली! आता गाड्यांमध्ये दिसणार सांगानेरी प्रिंट असलेले ब्लँकेट, खासियत काय?

Nilesh Ghaywal passport case : निलेश घायवळला पासपोर्टसाठी मदत करणाऱ्या एजंटची चौकशी होणार; सध्या कारागृहात भोगतोय शिक्षा

SCROLL FOR NEXT