Buldhana Bus Accident 
विदर्भ

Buldana Bus Accident : धक्कादायक! ‘समृद्धी’वर दोनशे किमीमध्ये अग्निशमन केंद्रच नाही; सरकारचं दुर्लक्ष

राजेश प्रायकर ः @rajeshp_sakal

नागपूर : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग सुरू होऊन सहा महिने लोटल्यानंतरही या मार्गावर प्रवाशांचे जीव वाचविण्याबाबत सुविधा नसल्याचे दिसून येत आहे. नागपूरपासून दोनशे किमी अंतरात एकही अग्निशन केंद्र नसल्याची बाब पुढे आली आहे. त्यामुळे वाहन जळाल्यास प्रवाशांना मृत्यूशिवाय पर्यायच नसल्याचे वास्तव आहे.

समृद्धी महामार्गाचे मागील ११ डिसेंबरला लोकार्पण करण्यात आले. लोकार्पणानंतर पंधरा दिवसांत अर्थात २८ डिसेंबरला रात्री दीड वाजताच्या सुमारास पहिला अपघात झाला. यात दोघांचा मृत्यू झाला होता.

एकूण पहिल्या महिनाभरात ४ गंभीर अपघात झाले असून यात १६ जण जखमी झाले. पाच किरकोळ अपघातात २० जण जखमी झाले. त्यानंतर या महामार्गावर अपघातांची मालिकाच सुरू झाली. त्यानंतर अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्यासंदर्भात राजकीय धुरळाही उडाला. तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी विरोधकांनी केली.

राज्य सरकारने उपाययोजनांसाठी पाऊले उचलले. परिवहन, रस्ते सुरक्षा विभाग व पोलिसांनी शिर्डी ते नागपूर समृद्धी महामार्गाची पाहणी केली. आरटीओ अधिकारी आणि एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन अपघात रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजनांवर चर्चा झाली.

परंतु यात टायर तपासणीसोबत नागपूर-शिर्डीदरम्यान प्रत्येक जिल्ह्यात एक याप्रमाणे आठ ठिकाणी चालकांसाठी समुपदेशन केंद्र उभारणे यावर चर्चा झाली. परंतु या मार्गावर मदत केंद्रे नाहीत. अग्निशमन केंद्रही नाही.

शुक्रवारी रात्री बुलढाण्याजवळ बस जळाल्याने २५ पेक्षा जास्त प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर ठराविक अंतरावर अग्निशमन केंद्राचा मुद्दा पुढे आला. नागपूरपासून दोनशे किमी अंतरात एकही अग्निशमन केंद्र नाही. त्यामुळे या अंतरात एखादे वाहन जळाल्यास आग विझविण्यासाठी एक ते दीड तास प्रतीक्षेशिवाय पर्याय नाही.

अशा स्थितीत प्रवाशांचा जीव जाण्याचीच अधिक शक्यता काही नागरिकांनी व्यक्त केली. राज्य सरकारने उपाययोजनांबाबत पुढाकार घेतला असला तरी अग्निशमन व मदत केंद्राचे गांभीर्य कुठेही दिसून येत नसल्याचे चित्र आहे.

लोकार्पणानंतर महिनाभरात बुलढाणा जिल्ह्यात १५ अपघात

समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणानंतर महिनाभरात बुलढाणा जिल्ह्यात १५ अपघात झाले. यात तीन गंभीर तर नऊ किरकोळ अपघाताचा समावेश आहे. यात दोघांचा मृत्यू झाला. एवढेच नव्हे अतिवेगाने वाहने चालविल्याप्रकरणी ३६ वाहनांवर कारवाई करण्यात आली होती. केवळ महिनाभरात बुलढाणा जिल्ह्याने समृद्धीचे जीवघेणे रुप अनुभवले.

- प्रवासी व ट्रॅव्हल्सकरिता महामार्गावर सुविधांचा अभाव

- शौचालय, प्रसाधनगृहांची सुविधा नाही

- जेवणासाठी ढाबा, हॉटेल्स नाही

- पेट्रोल पंपाची संख्या अतिशय कमी

बॅरीकेट्सला लावण्यात आलेले कुलूप. त्यामुळे यूटर्नसाठी ६०-६० किमी कापावे लागणारे अंतर

प्रवाशांची प्रकृती बिघडल्यास यूटर्न घेण्यास होणारा त्रास

नागपूरपासून दोनशे किमी परिसरात कुठेही अग्निशमन केंद्र नाही. मदत केंद्रही नाही. त्यामुळे अपघात झाल्यास प्रवाशांनावर वेळेत उपचार होणे अशक्य आहे. त्यामुळे नाहक बळी जाण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने या मार्गावर ठराविक अंतरावर अग्निशमन व मदत केंद्र उभारणे गरजेचे आहे.

- बाबा डवरे, अध्यक्ष, नागपूर ट्रॅव्हल्स असोसिएशन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT