Firing sakal
विदर्भ

देवपूजा करताना सासूवर झाडली सुनेने गोळी

नेहमीच होत असलेल्या छळाला कंटाळून सासू देवपूजा करीत असताना रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून खून केला, अशी कबुली सुनेने पोलिसांत दिली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नेहमीच होत असलेल्या छळाला कंटाळून सासू देवपूजा करीत असताना रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून खून केला, अशी कबुली सुनेने पोलिसांत दिली आहे.

आर्णी (जि. यवतमाळ) - नेहमीच होत असलेल्या छळाला कंटाळून सासू देवपूजा करीत असताना रिव्हॉल्व्हरमधून (Revolver) गोळी (Firing) झाडून खून (Murder) केला, अशी कबुली सुनेने पोलिसांत (Police) दिली आहे. पोलिसांनी मारेकरी सुनेला अटक (Arrested) केली असून, न्यायालयाने तिला येत्या २७ जानेवारीपर्यंत दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या खून प्रकरणाने जिल्हाभरात खळबळ उडाली आहे.

आशा पोरजवार असे मृत महिलेचे नाव आहे. तर खूनप्रकरणी सरोज अरविंद पोरजवार हिला अटक करण्यात आली. शुक्रवारी (ता.२१) सेवानिवृत्त सैनिक प्रभू गव्हाणकर यांच्या घरातील रिव्हॉल्व्हर व सात जिवंत काडतूस सरोज पोरजवार हिने चोरी करून आपल्या घरात लपवून ठेवले होते. सोमवारी सासू पूजा करीत असताना सुनेचा राग अनावर झाला व चोरी केलेल्या रिव्हाल्व्हरमधील गोळी सासूच्या डोक्यात झाडली. गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी दीर मंगेश किसन पोरजवार (वय २८, रा. मुबारकनगर, आर्णी) याने आर्णी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून सरोज उर्फ बबली पोरजवार (वय ३२) हिच्याविरुद्ध गुन्हा नोंद करून रात्री सव्वाअकरा वाजता अटक करण्यात आली. दरम्यान, तिला आज मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता येत्या २७ जानेवारीपर्यंत दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास दारव्हा उपविभागीय पोलिस अधिकारी आदित्य मिरखेलकर करीत आहेत.

पोलिस अधीक्षकांनी गाठले घटनास्थळ

आर्णीतील खून प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी सोमवारी रात्री साडेदहा वाजता मृत आशा पोरजवार यांच्या घरी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर पोलिस ठाण्यात येऊन एसडीपीओ मिरखेलकर व ठाणेदार पितांबर जाधव यांना सूचना दिल्या.

सिलिंडर मागे आढळली रिव्हॉल्व्हर

सासू आशा पोरजवारकडून नेहमीच छळ होत होता. त्यामुळे रिव्हॉल्व्हर व सात जिवंत काडतुसाची चोरी केली, अशी कबुली सुनेने दिली. सासू देवपूजा करीत असताना गोळी झाडली. ही बंदूक स्वयंपाक घरातील सिलिंडरच्या मागे लपवून ठेवली होती.

रिव्हॉल्व्हर लपविण्याचा प्रयत्न

सेवानिवृत्त सैनिक प्रभू गव्हाणकर यांच्या घरातून शस्त्र चोरीला गेल्याची तक्रार पोलिसांत दिली. पोलिसांनी शेजारी राहणार्‍या लोकांच्या घरांची झडती घेतली. पोरजवार यांच्याही घरी पोलिस धडकले असता, सुनेने रिव्हॉल्व्हर साडी व ब्लाउजमध्ये लपविण्याचा प्रयत्न केला. जेव्हा-जेव्हा पोलिस चौकशीला यायचे त्यावेळी महिला बंदूक लपविण्याचा प्रयत्न करायची.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : उत्तरप्रदेशात मराठी तरुणाला भोजपुरीत बोलण्यासाठी दमदाटी, भाषा येत नाही म्हटल्यावर....पाहा व्हिडीओ

Latest Maharashtra News Live Updates: नांदगावच्या दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान, ग्रामस्थ आनंदीत

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटनेचा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

SCROLL FOR NEXT