file photo 
विदर्भ

बापरे! दोन महिन्यांपासून निर्ली गावचे गावकरी भटकताहेत पाण्यासाठी, प्रशासनाने करावी उपाययोजना

आनंद चलाख

राजुरा (जि. चंद्रपूर) : तालुक्‍यातील निर्ली या गावात मागील दोन महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. निर्ली गावात पूर्वीपासून पिण्याच्या पाण्यासंबंधी तुटवडा आहे. गावात एकच हॅण्डपंप असून, तोसुद्धा मागील दोन महिन्यापासून बंद आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

ग्रामपंचायत प्रशासनाच्या भोंगळ कारभाराला संतापून गावकऱ्यांनी शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख बबन उरकुडे यांना या गंभीर समस्यांबाबत माहिती दिली. त्यांनी गावात भेट देऊन संबंधित पंचायत समिती अधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा केली. प्रशासनाकडून संबंधित समस्या आजच्या आज मार्गी लावू, असे आश्वासन देण्यात आले. त्यामुळे गावकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.


सध्या हिवाळ्याचे दिवस आहेत. हिवाळ्यातच पाण्याची टंचाई जाणवू लागली असल्याने नागरिक त्रस्त आहे. त्यामुळे निर्ली येथील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. याकडे प्रशासनाने गावकऱ्यांची पाणी समस्या लक्षात घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. यावेळी कढोलीचे शाखाप्रमुख महेश झाडे, निर्लीचे शाखाप्रमुख सचिन धांडे, पोलिस पाटील धांडे यांच्यासह गावकरी उपस्थित होते.

दरवर्षींच पाण्याची टंचाई

निर्ली परिसरात दरवर्षी पाण्याची स्थिती अतिशय बिकट असते. यावर्षी तर हिवाळ्यातच पाण्याची समस्या जाणवू लागल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन गावकऱ्यांची पाण्याची समस्या दूर करावी, अशी मागणी केली जात आहे.

बोअरवेल दुरुस्त करावी
या भागांमध्ये दरवर्षी पाणीटंचाई निर्माण होते. याबाबत कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नाही. भूगर्भातील पाण्याची पातळी खाली जात असल्यामुळे या क्षेत्रात उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. दोन महिन्यांपासून येथील बोअरवेल नादुरुस्त असल्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने बोअरवेल दुरुस्त करून समस्या त्वरित दूर करावी.
- बबन उरकुडे
माजी उपजिल्हाप्रमुख शिवसेना.

(संपादन : दुलिराम रहांगडाले)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: राज्यात पुढील ५ दिवस हवामान बिघडणार! पुणे, नागपूरसह अनेक जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी; विभागाकडून सतर्कतेचं आवाहन

Pakistan Blast: पाकिस्तान पुन्हा हादरलं! शांतता रॅलीत भीषण स्फोट; १४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी, नेमकं काय घडलं?

प्रश्न कमी, परीक्षा आता एकाच शिफ्टमध्ये; NEET PG 2026 चे नवे नियम जाहीर, 'या' 5 गोष्टी जाणून घ्या...

FDA थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करते? तुकाराम मुंढेंनी कारवाईमागचं नेमकं कारणच सांगितलं! जाणून घ्या कायदा...

Gangaapur Accident: गंगापूर फाट्याजवळ उभ्या ट्रकला आयशरची जोरदार धडक; २५ वर्षीय चालक गणी शेख जागीच ठार

SCROLL FOR NEXT