Show cause notice to the Mayor of Gadchiroli 
विदर्भ

गडचिरोलीच्या नगराध्यक्षांना कारणे दाखवा नोटीस; खासगी वाहनाचे देयक भोवले

मिलिंद उमरे

गडचिरोली : गडचिरोली नगर परिषदेच्या अध्यक्ष योगिता पिपरे यांनी खासगी वाहन वापरून खर्चाचे प्रतिपूर्ती देयक नगर परिषदेकडून प्राप्त केल्याचा ठपका ठेवत नगरविकास विभागाचे कार्यासन अधिकारी प्रवीण पाटील यांनी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यामुळे आधीच अनेक अडचणींचा सामना करणाऱ्या नगराध्यक्ष पिपरे यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.

नगराध्यक्ष पिपरे यांना अपात्र ठरविण्याचे प्रयत्न काही महिन्यांपासून सुरू आहेत. आता या कारणे दाखवा नोटीसमुळे त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे. या नोटीसमध्ये त्यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले आहेत. नोटीसमध्ये म्हटले आहे की, नगराध्यक्ष योगिता पिपरे यांचे पती प्रमोद पिपरे हे स्वीकृत सदस्य आहेत. त्यांना नगर परिषदेच्या सभेत मत देण्याचा किंवा कोणताही ठराव मांडण्याचा अधिकार नाही. तरीही ते नगर परिषदेच्या कामकाजात प्रत्यक्ष हस्तक्षेप करतात.

स्वत:चे वाहन वापरून त्याच्या खर्चाचे प्रतिपूर्ती देयक नगर परिषदेकडून प्राप्त करून घेतले आहे. तसेच आदर्श आचारसंहितेच्या काळातही नियमबाह्य स्वत:च्या वाहनाचा वापर करून प्रतिपूर्ती बिलाची रक्‍कम नगर परिषदेकडून घेतली.

या गैरवर्तनाबद्दल आपल्याला नगर परिषदेच्या अध्यक्षपदावरून दूर करून पुढील ६ वर्षांसाठी पालिका सदस्य होण्यास किंवा कोणत्याही इतर स्थानिक प्राधिकरणाचा सदस्य होण्यास अपात्र का करण्यात येऊ नये, अशी नोटीस बजावली.

याचा लेखी खुलासा नोटीस प्राप्त झाल्यापासून १५ दिवसांच्या आत सरकारला सादर करावा, अन्यथा पुढील कार्यवाही करण्यात येईल, असेही नोटीसमध्ये कार्यासन अधिकारी प्रवीण पाटील यांनी म्हटले आहे. 

सर्वांशी चर्चा करून निर्णय घेणार
नोटीस मिळाली असून आम्ही आमच्या वकिलांशी संपर्क साधला आहे. नोटीसचे उत्तर कशाप्रकारे द्यायचे, यासंदर्भात वकिलांच्या सल्ल्यानुसार व सर्वांशी चर्चा करून निर्णय घेणार आहे.
- योगिता पिपरे,
अध्यक्ष, नगर परिषद, गडचिरोली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Administrative Reshuffle : प्रशासनात मोठा भूकंप! १५ IAS अधिकाऱ्यांसह ३८ बड्या अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; पाहा कोणाची कुठे झाली रवानगी?

IND vs WI, 3rd ODI: केएल राहुलचं क्लासिकल शतक! रोहित-ऋतुराजची अर्धशतकं; भारताने वेस्ट इंडिजसमोर उभा केला धावांचा डोंगर

Asian Games 2026: हॉकीत भारतच आशियाचा राजा! महिलांनंतर पुरुष संघानेही जिंकलं गोल्ड मेडल; ऑलिम्पिक तिकीटही पक्के

Latest Marathi News Live Update : गांधी जयंतीपासून रोजगार सेवकाचे कामबंद आंदोलन

Pune Teachers MLC election : महायुतीचे विधान परिषद जागावाटप निश्चित; हायव्होल्टेज पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपच्या वाट्याला; मंगेश चिवटे बंडखोरी करणार

SCROLL FOR NEXT