टेकाडी : समस्यांचा महापूर असलेली टेकाडी येथील मोक्षधाम.  
विदर्भ

स्मशानभूमीत वाढली झुडपे, विसावा दिसेना

सतीश घारड

टेकाडी (जि. नागपूर) : स्मशानभूमी बांधकाम व सौंदर्यीकरणासाठी महाराष्ट्र सरकारच्या जनसुविधा योजनेतून 10 लाखांपेक्षा अधिकचा निधी दिला जातो. ग्रामपंचायत प्रशासनाकडून पाठविलेल्या प्रस्तावानुसार सरकारद्वारे निधी उपलब्ध करून दिला; परंतु टेकाडी ग्रामपंचायतअंतर्गत स्मशानभूमीत समस्यांचा महापूर आल्याचे चित्र आहे. स्मशानभूमीत झुडपे वाढली असून, विसावा दिसेनासा झाला आहे. ग्रामपंचायत टेकाडी कोळसा खाणअंतर्गत मागील प्रशासनाच्या कार्यकाळात वेकोलिच्या सीएसआर निधीतून स्मशानभूमी शेड, जिल्हा परिषदेअंतर्गत सुरक्षा भिंत, विसावा ओटा तर तंटामुक्तीअंतर्गत मिळालेल्या बक्षिसाच्या काही रकमेतून गट्टू लावण्याचे कार्य करण्यात आले. यानंतर झालेल्या निवडणुकीत "सबका साथ, सबका विकास' म्हणत एक हाती सत्ता काबीज करून गावाची धुरा हरहुन्नरी पुढाऱ्यांनी हातात घेतली. मात्र, दोन वर्षांचा कार्यकाळ लोटत असतानाही विकास काही दिसेना झाला आहे.
स्मशानभूमीत आलेल्या नागरिकांना बसण्यासाठी जागा नाही. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. पिण्याच्या पाण्यासोबतच राख थंड करण्यासाठी पाण्याची व्यवस्था स्वतः करावी लागते. परंतु, हातपंपाची व्यवस्था करणे प्रशासनाला गरजेचे वाटत नाही. पाण्याची टाकी आहे; पण तुटलेले नळ दुरुस्ती करायला प्रशासनाकडे वेळ नाही. नागरिकांना उन्हाचे चटके व पाण्याचा मार सहन करावा लागत आहे. अंत्यसंस्काराला लागणारे पाणी मृतदेहासोबतच आणाव लागते. रात्री अंत्यसंस्काराची गरज पडल्यास विजेचीदेखील व्यवस्था नाही. स्मशानभूमीचे सुशोभीकरण, सभामंडपासोबत अन्य मूलभूत सुविधांचा अभाव आहे.गाव तिथे स्मशानभूमी अशी सरकारची योजना असली तरी निद्रिस्त लोकप्रशासन व उदासीन लोकप्रतिनिधींकडे स्मशानभूमी सौंदर्यीकरण, लोकांना बसण्यासाठी शेड व खुर्च्या सोबत मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी मारुती हुड, उत्तम गाडगे, प्रवीण ठाकरे, नरेश कांबळे, मनोज लेकुरवाळे, कमलाकर राऊत आदींनी केली आहे.
कार्यभार हाती घेतल्यापासून स्मशानभूमीसंदर्भाचा विकासकामांचा विषय सभेत घेण्यात आलेला नाही. त्यामुळे सौंदर्यीकरण, सभामंडप, विजेची व्यवस्था आदी कुठल्याहीसंदर्भात सरकारकडे प्रस्ताव पाठविलेला नाही. यानंतर दक्षता घेऊन प्रस्ताव नक्की पाठवू. - प्रवीण कुंभारे,ग्रामविकास अधिकारी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Konkan Coastal Flood Risk : कोकण किनारपट्टीला मोठा धोका! यंदा पावसाळ्यात 23 दिवस समुद्राला 'उधाण'; 4.5 मीटरपेक्षा उंच लाटा उसळणार, 145 गावांना सतर्कतेचा इशारा

Solapur NCP Politics: साेलापूरमध्ये राष्ट्रवादीत ‘चलती’ कोणाची? अभिजित पाटील की संजयमामा, मेमध्ये मोठ्या घडामोडींचे संकेत!

Latest Marathi News Live : सिद्धेश्वर एक्सप्रेसमध्ये दरोड्याचा कट उधळला, नऊ संशयित महिलांना आरपीएफ पोलिसांकडून अटक

लग्नसमारंभात मोठी दुर्घटना! बांधकामाचा स्लॅब कोसळून वऱ्हाडी खड्ड्यात पडले; अनेकजण जखमी, एकाचा मृत्यू

Shahu Maharaj Document : डोंगर गावात सापडलं 1709 मधील राजर्षी शाहू महाराजांचं राजाज्ञापत्र; काय आहे त्या कापडी पिशवीतलं गुपित? 10 पत्रांनी उलगडला इतिहास

SCROLL FOR NEXT