Bakra Plant Blooms After 14 Years : 14 वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपली! वाकीघोल पठारावर 'बकरा' वनस्पती बहरली, बघण्यासारखा आहे निसर्गाचा दुर्मिळ नजारा

Bakra Plant Blooms After 14 Years at Wakighol Plateau : कोल्हापूर जिल्ह्यातील वाकीघोलच्या रक्षादेवी पठारावर तब्बल १४ वर्षांनंतर बकरा अर्थात टोपली कारवी वनस्पती फुलली आहे. पिवळ्या फुलांनी सजलेले पठार निसर्गप्रेमींचे आकर्षण ठरत आहे.
Topli Karvi flowering at Wakighol plateau

Topli Karvi flowering at Wakighol plateau

esakal

Updated on: 

गारगोटी : भुदरगड आणि राधानगरी तालुक्यांना जोडणाऱ्या वाकीघोल परिसरात रक्षादेवी पठारावरील तब्बल १४ वर्षांनंतर ‘बकरा’ वनस्पती बहरली (Bakra plant flowering after 14 years) आहे. ‘टोपली कारवी’ म्हणूनही ओळखल्या जाणाऱ्या या वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती व पिवळ्या फुलांमुळे संपूर्ण पठार निसर्गसौंदर्याने नटले आहे. डोंगरमाथ्यावर फुललेला हा मनमोहक नजारा पाहण्यासाठी पर्यावरणप्रेमी आणि निसर्गप्रेमींची पावले वाकीघोल पठाराकडे वळू लागली आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com