shweta shanke
shweta shanke e sakal
विदर्भ

अफगाणिस्तानातून १२९ भारतीयांना परत आणण्यात दर्यापूरच्या लेकीचा सहभाग

सकाळ वृत्तसेवा

दर्यापूर (जि. अमरावती) : तालिबानने संपूर्ण अफगाणिस्तानवर ताबा (Taliban attack on Afghanistan) मिळविला आहे. अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्षांनी देखील देश सोडला. तसेच तालिबान्यांच्या भीतीनं अनेक नागरिकांनी देशातून पळ काढला आहे. भारतातून एअर इंडियाचे एक विमान रविवारी गेले होते. त्याच विमानातून अमरावतीच्या दर्यापूरची लेक आणि तिच्या सहकाऱ्यांनी १२९ भारतीयांना अफगाणिस्तानमधून सुखरूप मायदेशी परत आणले.

अफगाणिस्तानातून १२९ भारतीयांना रविवारी एअर इंडियाच्या एआय- २४४ या विमानाने भारतात आणण्यात आले. या विमानात हवाईसुंदरी होती, मूळची दर्यापूरची (जि. अमरावती) श्वेता चंद्रकांत शंखे. सध्या दिल्लीत असलेल्या श्वेताशी ‘सकाळ’ने संपर्क साधला असता तिने सांगितलेला काबूल विमानतळावर प्रसंग अंगावर शहारे आणणारा होता.

हवाई सुंदरी श्वेता शंखे सांगतात ''जवळजवळ चार तास आम्ही काबूल विमानतळावर होतो. आपल्याच देशातून जीव वाचविण्यासाठी बाहेर पडण्यासाठी सुरू असलेली अफगाणी नागरिकांची केविलवाणी धडपड पाहून तेथील भयंकर परिस्थितीची जाणीव आम्हाला होत होती. एकदाचे तीन तास ४८ मिनिटांनी आमच्या विमानाने उड्डाण केले. तरीही जीव थाऱ्यावर नव्हताच. अखेर रविवारी रात्री साडेआड वाजता आमचे विमान दिल्लीत उतरले आणि सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला.''

श्वेता सांगत होती, एअर इंडियाचे एआय- २४४ हे विमान दिल्ली येथून काबूलला जाण्यासाठी सज्ज होते. मात्र, ही फ्लाईट नेहमीसारखी नव्हती. कारण अवघ्या २४ तासांमध्ये काबूल तालिबान्यांच्या हाती पडले. तेथे नेमके काय घडत आहे हे विमानातील क्रू मेम्बर्सनाही सांगितले गेले नव्हते. एरवी आम्हाला तेथे काय घडत आहे, याची माहिती होती. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी आम्ही ठेवली होती. कारण तुम्हाला सिद्ध होण्यासाठी असे प्रसंग वारंवार येत नाहीत. आम्ही सर्व तयारीनीशी तेथे गेलो होतो. प्रवाशांचे जेवणही सोबत घेतले होते.

श्वेता पुढे म्हणाली, दिल्ली येथील इंदिरा गांधी विमानतळावरून रविवारी दुपारी १२.४५ ला लाहोरमार्गे काबूलकडे उड्डाण केले. १ वाजून ४५ मिनिटांनी आम्ही काबूलच्या आकाशात पोहचलो. पण लॅंडिंगची परवानगी मिळत नव्हती. कारण विमानतळावर प्रचंड गोंधळ होता. तालिबानी काबूलमध्ये घुसल्याने एअर ट्रॅफिक कंट्रोलर कर्मचारी पळून गेले होते. आमचे विमान तालिबान्यांच्या नजरेत येऊ नये म्हणून पायलटने रडार बंद केले. आमच्या मनातही धाकधूक सुरू होती. कारण तब्बल १ तास आम्ही १६ हजार फूट उंचीवर घिरट्या मारत होतो. परंतु, काबूलमधील स्थिती माहीत असल्याने विमानात जास्तीचे इंधन भरले होते. बाहेर वाराही वेगाने वाहत असल्याने विमान हेलकावे खात होते.

अखेर परवानगी मिळाली व दुपारी २ वाजून ३२ मिनिटांनी आमचे विमान खाली उतरले. विमानतळ नेमके कुणाच्या ताब्यात आहे याचा मुळीच अंदाज नव्हता. जिवाला धोका असल्याने कुणालाही विमानाच्या बाहेर पडण्याची परवानगी नव्हती. सर्वत्र, सायरन, गोळीबार, नागरिकांचे ओरडणे असा कोलाहल सुरू होता. अमेरिकन सी-१७ ग्लोबमास्टर आणि हेलिकॅाप्टर्स यांच्या आवाजाने जणू लढाईच पेटली असे वाटत होते. सर्वत्र धुराचे साम्राज्य होते.

विमानातील प्रवाशांना सुखरूप परत आणणे हेच आमचे एकमेव ध्येय होते. दिल्ली ते काबूल हे अंतर १.०५ ते १.२० मिनिटांचे आहे. ६ वाजून २० मिनिटांनी काबूल सोडले. रात्री साडेआड वाजता विमान दिल्ली विमानतळावर लॅंड झाले आणि सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UAPA: ओसामा बिन लादेनचे फोटो, ISIS चे झेंडे बाळगणे गुन्हा नाही: हायकोर्ट

MS Dhoni : अखेर सत्य आले समोर! रणनीती नाही तर... या कारणामुळे ९व्या क्रमांकावर बॅटिंगसाठी आला 'थाला'

Viral: पवार गटाचं काम करणाऱ्याला दत्ता भरणे यांच्याकडून शिवीगाळ? व्हिडिओ रोहित पवारांकडून शेअर

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लातुरातील सुनेगाव-सांगवीतील गावकऱ्यांचा मतदानाला बहिष्कार

Met Gala 2024 : परी म्हणू की सुंदरा! रेड कार्पेटवर ईशाचाच जलवा, स्पेशल फ्लोरल ड्रेस बनवण्यासाठी लागले तब्बल 10 हजार तास

SCROLL FOR NEXT