File photo 
विदर्भ

सिंदी शहरात चोरट्यांचा हैदोस

सकाळ वृत्तसेवा

सिंदी रेल्वे (वर्धा) : शहरात विविध ठिकाणी दोन दुकानांसह एका घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी हजारो रुपयांचे साहित्य लंपास केले. शनिवारी (ता. 17) रात्री हा घटनाक्रम घडला. या प्रकरणी पोलिसांनी फिर्यादी गणेश नागोराव बावणे, प्रवीण सिर्सीकर यांच्या तक्रारीवरून चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या चोरीच्या घटनांनी शहरात असुरक्षिततेचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी शहरात रात्रगस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
शहरातील पळसगाव मार्गावरील गणेश नागोराव बावणे हे परिवारासोबत राखीनिमित्त बाहेरगावी गेले होते. मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून दोन कपाटांतील सोन्याच्या तीन अंगठ्या (किंमत 52 हजार 500 रुपये), एक जोड चांदीच्या तोरड्या (किंमत तीन हजार रुपये) व रोख 14 हजार रुपये असा 69 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल पळविला. बाजार चौकातील गणेश मंदिरालगत प्रवीण सिर्सीकर यांच्या हार्डवेअर दुकानातील विक्रीचे 6 हजार रुपये व त्यांचे चुलतभाऊ जय विनोद सिर्सीकर यांच्या कृषी केंद्राचे कुलूप तोडून 100 रुपये चोरून नेले.
गणेश बावणे हे राखीनिमित्त बाहेरगावी गेले होते. त्यामुळे चोरट्यांनी संधी साधली. आज सकाळी नऊ वाजतादरम्यान चोरी झाल्याचे शेजाऱ्यांच्या निदर्शनास आले. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. या वेळी ठसे तज्ज्ञांचे पथक वर्धा येथून पाचारण करण्यात आले होते. ठशाचे नमुने घेऊन तपासणीकरिता पाठविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. तपास ठाणेदार प्रशांत काळे यांच्या मार्गदर्शनात हवालदार चंद्रभान मेघरे करीत आहेत. शहरात मागील दीड वर्षापासून चोरट्यांनी कुलूपबंद घरांवर लक्ष केंद्रित केले आहे. चोरीच्या घटनांची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे; मात्र अद्याप एकाही चोरीच्या घटनेचा उलगडा लागलेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Ganpati Sansthan : सांगली संस्थानचा वाद चव्हाट्यावर! 'युवराज आदित्यराजे हेच कायदेशीर वारस,'; विजयसिंहराजेंची स्पष्टोक्ती, भाग्यश्री यांनी गुरुजींची माफी मागावी

Asian Games: सलग दुसऱ्यांदा गोल्ड मेडलसाठी सज्ज! भारतीय हॉकी संघ ऑलिंपिक पात्रतेसाठीही प्रयत्न करणार; पाहा Schedule

Moon Discovery: चंद्रावर सापडले प्रचंड विवर! ७२८ फूट रुंद, १४१ फूट खोल; दोन वर्षांपूर्वीच्या उल्कापाताचा थरारक पुरावा

Marathi News Live Updates : आमच्या विरोधात कटकारस्थान, या मागे नेपाळी कनेक्शन; संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप

TMC Name Symbol Row : तृणमूल काँग्रेसच्या नाव-चिन्हावरून वाद; ममता बॅनर्जी गटाकडून तीन पर्याय सादर, निवडणूक आयोगाच्या निर्णयावरही तीव्र आक्षेप

SCROLL FOR NEXT