सावनेर : समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना प्रयास गटचे सदस्य.  
विदर्भ

सिंधूताई सपकाळ म्हणाल्या, स्त्रियांनो, तुम्हीच तुमच्या जीवनाच्या शिल्पकार 

सकाळ वृत्तसेवा

सावनेर (जि. नागपूर) : स्त्रीला वेदना म्हणजे काय ठाऊक असते. ती जीवनात कितीही खडतर प्रसंग आले तरी हार मानत नाही. आलेल्या प्रसंगाला धैर्याने तोंड देण्याचे सामर्थ्य स्त्रीमध्ये आहे. विदर्भातील अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या; मात्र एकाही शेतकऱ्याच्या पत्नीने आत्महत्या केली नाही. स्त्रीच स्त्रीच्या जीवनाची खरी शिल्पकार असल्याचे मत समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांनी व्यक्‍त केले. 
सावनेर येथील सेलिब्रेशन सभागृहात गांधी जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात समाजप्रबोधन करताना त्या बोलत होत्या. यावेळी आमदार सुनील केदार, योगेश कुंभलकर, डॉ. संगीता जैन, डॉ. विजय घटे, साहित्यिक विजया मारोतकर, वर्धा येथील अन्न व औषधी विभागाचे सहायक आयुक्त बल्लाळ, निरीक्षक स्वाती भरडे, पंजाब नॅशनल बॅंकेच्या व्यवस्थापक पल्लवी मोडक, कार्यक्रमाचे आयोजक सामाजिक कार्यकर्त्या वैशाली घटे आदींची उपस्थिती होती. 
मुलींनो, खूप शिका व डिग्री घ्या; परंतु विदर्भाच्या मातीची व संस्कृतीची जोपासना करा, असा सल्लाही सिंधूताई सपकाळ यांनी दिला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला गांधीजींच्या फोटोला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. समाजातील उल्लेखनीय कार्यासाठी सिंधूताईंच्या हस्ते अनेकांना गोरविण्यात आले. शहरातील स्मशानभूमीत स्वच्छता व सौंदर्यीकरण तसेच श्रमदान कार्यासाठी प्रयास टीमच्या युवकांनाही सन्मानित करण्यात आले. महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी दांडीयात्रा काढण्यात आली. संचालन तिवारी यांनी केले तर गोपाल घटे यांनी आभार मानले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

Team India Schedule: भारताच्या वेळापत्रकात आणखी एक दौरा... वैभव सूर्यवंशीला या संघात नक्की जागा मिळणार

Pune News : पुणे महापालिकेच्या तिजोरीत ५ हजार ३२६ कोटी; मिळकतकरातून २,९८५ कोटी, तर बांधकाम करातून २,३४१ कोटी

सायली-प्रियामध्ये जोरदार जुंपली; एकमेकांच्या झिंज्या उपटणार सुभेदारांच्या सुना, कारण ऐकून अर्जुनही हैराण, प्रेक्षक म्हणतात-

SCROLL FOR NEXT