Girl Fell In to Boiling Milk
Girl Fell In to Boiling Milk 
विदर्भ

उकळत्या दुधाच्या कढईत पडलेल्या 'त्या' चिमुरडीचा मृत्यू; दोन आठवडे दिलेली झुंज अखेर अपयशी

सकाळ डिजिटल टीम

बुलढाणा येथे घराबाहेर खेळताना उकळत्या दुधाच्या कढाईत पडल्याने गंभीररित्या भाजलेल्या चिमुरडीची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. या सहा वर्षीय मुलीचा तब्बल तीन आठवडे मृत्यूशी संघर्ष सुरू होता. अखेल उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

साम टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, बुलडाणा शहरातील हनुमान चौकातील हनुमान दूध डेअरीचे संचालक युवराज जाधव हे नांदुरा रस्त्यावरील जाधववाडीत आपल्या कुटुंबीयांसोबत राहतात. दरम्यान २७ एप्रिल रोजी त्यांनी घराच्या आवारात मोठ्या कढईमध्ये दूध उकळण्यासाठी ठेवले होते. यादरम्यान युवराज जाधव यांची मुलगी ओमश्री खेळताना उकळत्या दुधाच्या कढईमध्ये पडली.

उकळत्या दुधात पडल्याने गंभीररित्या भाजलेल्या ओमश्रीला लगेच कढाईतून बाहेर काढण्यात आलं आणि कोलते हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र प्राथमिक उपचार झाल्यानंतर तिला प्रथम जळगाव येथे आणि नंतर मुंबई येथे हालवण्यात आलं.

मुंबईतील रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. तब्बल तीन आठवड्याच्या उपचारानंतर ओमश्रीची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. गुरुवारी सकाळी मौजे वाघुड येथील जाधव फार्मवर ओमश्रीवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: भाजप -एनडीए 2-0 ने आघाडीवर; कोल्हापुरात पीएम मोदांचा विरोधकांवर हल्लाबोल

Ujjwal Nikam: "माझा जन्म हनुमान जयंतीचा", 'मविआ' उमेदवाराला कसं रोखणार या प्रश्नावर निकमांचा थेट युक्तिवाद

Ujjwal Nikam: उज्ज्वल निकम यांना भाजपकडून मुंबई उत्तर-मध्यमधून उमेदवारी जाहीर; पुनम महाजन यांचा पत्ता कट

IPL 2024 DC vs MI Live Score : मुंबईला तगडा झटका! खलीलने आक्रमक खेळणाऱ्या सूर्यकुमारचा अडथळा केला दूर

Pune News : पुण्याचे माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांचे दीर्घ आजाराने निधन

SCROLL FOR NEXT