Sixty nine patients got discharge from bhandara 
विदर्भ

या जिल्ह्यातून आली गुड न्यूज , 69 जणांना मिळाला दिलासा...

सकाळ वृत्तसेवा

भंडारा : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रभावी उपाययोजना केल्या असून आतापर्यंत 69 व्यक्तींना हॉस्पिटलमधून तर 37 व्यक्तींना आयसोलेशन वार्ड मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 147 व्यक्तींचे घशातील नमुने इंदिरा गांधी शासकीय रुग्णालय (मेयो), नागपूर येथे पाठविण्यात आले असून त्यापैकी 125 व्यक्तींचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. परदेशातून एकही व्यक्ती जिल्ह्यात आली नसून 24 व्यक्ती रुग्णालय अलगीकरण कक्षात आहे तर आयसोलेशन वार्डमध्ये 23 व्यक्ती भरती आहेत.

1 मार्च ते 15 एप्रिल दरम्यान मुंबई, पुणे व इतर राज्यातून परत आलेल्या व्यक्तींची संख्या 20 हजार 648 आहेत. यापैकी 4 हजार 938 व्यक्तींचा 28 दिवसांचा विलगीकरण कालावधी पूर्ण झाला आहे. 15710 व्यक्तींना विलगीकरणाचे निर्देश देण्यात आले आहेत. भंडारा जिल्ह्यामध्ये आतापर्यंत एकही कोरोनाग्रस्त रुग्ण आढळलेला नाही. तरीसुद्धा शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात खबरदारीच्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. भंडारा जिल्ह्यामधील 9 शासकीय वसतिगृहामध्ये विस्थापित तसेच मजूर यांच्यासाठी निवारागृह करण्यात आले आहे. या ठिकाणी भोजन, वैद्यकीय तपासणी, योगा व समुपदेशनाची व्यवस्था आहे.

जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीपचंद्रन यांच्या नेतृत्त्वात जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना आखत असून वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्यावर भर देण्यात येत आहेत. नागरिकांनी आवश्‍यकता नसताना घराबाहेर पडू नये, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. सोशल डिस्टन्सिंग पाळून जीवनावश्‍यक व्यवहार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 2nd Test: भारताला विजयाची संधी, पण पाऊस थांबणार कधी? शेवटच्या दिवशी खेळ झाला नाही तर काय, जाणून घ्या

'पुन्हा तोच बसस्टॉप' तेजश्री दिसणार जुन्या स्टॉपवर, फोटो शेअर करत म्हणाली, 'तेच ठाणे, तेच ठिकाण आणि तेच तुम्ही..'

Manmad News : मनमाड बाजार समितीच्या अडचणींवर मुख्यमंत्री फडणवीसांचा ‘सर्जिकल स्ट्राइक

Crime: मुंबईत धक्कादायक प्रकार! आधी गळा दाबून मारलं, नंतर ग्रॅनाइट मशीनने पत्नीचा शिरच्छेद अन्...; विक्षिप्त पतीचं कृत्य

'मला मराठी येत नाही, हिंमत असेल तर हकलून दाखवा' प्रसिद्ध अभिनेत्याचं ठाकरे बंधूंना चॅलेंज, म्हणाला, 'भाषेच्या नावावर हिंसा...'

SCROLL FOR NEXT