Accident
Accident 
विदर्भ

झोपलेल्या मजुरास सिमेंट मिक्‍सरने चिरडले

सकाळवृत्तसेवा

नागपूर - फूटपाथवर झोपलेल्या मजुरास मेट्रोतील सिमेंट मिक्‍सरने चिरडल्याची धक्कादायक घटना बुधवारी (ता. २४) पहाटे साडेतीनच्या सुमारास मध्यवर्ती कारागृह परिसरातील कृपलानी चौकात घडली. दुख्खू बुट्टू नायक (वय २५, रा. शिवनगाव) असे मृत मजुराचे नाव आहे. तो मूळचा पश्‍चिम बंगाल राज्यातील पुरुलिया जिल्ह्यातील रहिवासी आहे. 

मध्यवर्ती कारागृह परिसरात मेट्रोचे काम सुरू आहे. या कामात अनेक बाहेरगावी राहणारे मजूर काम करतात. त्यापैकीच एक असलेला दुख्खू बुट्टू नायक हा दुसऱ्या दिवशी सकाळीच काम असल्याने रात्री घराकडे न जाता आपल्या इतर चार मित्रांसह कामाच्या ठिकाणीच थांबत बाजूच्या फूटपाथवर झोपी गेला. पहाटे साडेतीनच्या सुमारास कामाच्या ठिकाणी एनसीसी कंपनीच्या सिमेंट काँक्रिटचे मिक्‍सर (एमएच ४०-बीजी८१३७) आले. मिक्‍सर वळण घेत असताना, थेट फूटपाथवर चढले. त्यामुळे फूटपाथवर झोपलेल्या दुख्खू बुट्टू नायक याच्या अंगावर गेले. मिक्‍सर खाली येताच तो किंचाळला. तसेच जखमी झाल्याने बेशुद्ध झाला. त्याच्या किंचाळ्या ऐकून इतर मजूर सैरावैरा पळू लागले. तोपर्यंत सिमेंट मिक्‍सर चालकही पसार झाला होता. 

काही वेळानंतर या घटनेची माहिती धंतोली पोलिसांना देण्यात आली. त्यांनी नायक यास शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी नेले. मात्र, तपासणीपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. या प्रकरणी मिक्‍सरचालक छोट शिवशंकर प्रसाद (वय ३५, रा. डोकरी, झारखंड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचा शोध घेण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

Lok Sabha Election 2024 : डमी नावाच्या उमेदवारांना निवडणूक लढविण्यास मनाई करा; प्रकरण कोर्टात पोहचलं पण...

SCROLL FOR NEXT