File photo 
विदर्भ

सरकारविरोधात नारेबाजी; शेकडो महिलांना अटक व सुटका

सकाळ वृत्तसेवा

चंद्रपूर : मानधनवाढीच्या प्रश्‍नाला घेऊन उपोषणाला बसलेल्या आशा, गटप्रवर्तकांनी जिल्हा परिषदेसमोर सोमवारी (ता. 9) जेलभरो आंदोलन केले. शेकडो महिलांनी रस्त्यावर ठाण मांडल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. शेवटी पोलिसांनी महिलांना अटक केली. त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली.
मानधनवाढीच्या प्रश्‍नाला घेऊन मागील तीन दिवसांपासून आशा, गटप्रवर्तकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे. मात्र, त्याची अद्याप दखल घेण्यात आली नाही. राज्यभरात आशा, गटप्रवर्तकांनी तीन सप्टेंबरपासून आंदोलन सुरू केले आहे. आशा कर्मचाऱ्यांचे मानधन तिप्पट करण्याचे आश्‍वासन शासनाने दिले होते. त्याची अंमलबजावणी निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी करावी, सेवेत कायम करावे, आशांना दहा हजार, तर गटप्रवर्तकांना पंधरा हजार रुपये मानधन द्यावे या मागण्यांना घेऊन हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. सध्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे. पाच दिवस लोटून गेले तरी याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे सोमवारी आझाद बागेतून मोर्चा निघाला. सरकारविरोधात नारेबाजी करीत मोर्चा जिल्हा परिषदेसमोर पोहोचला. तेथे महिलांनी नारेबाजी करीत ठिय्या मांडला. त्यामुळे या मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती. आयटकचे राज्य सचिव विनोद झोडगे, संतोष दास, प्रा. नामदेव कन्नाके, देवराव चवरे, दिलीप परचाके, देवराव चवरे, राजू गैनवार, अमोल मारकवार, प्रकाश रेड्डी, ममता भिमटे, मनीषा नंदगिरवार, कल्पना मिलमिले, सुनंदा मिलमिले, प्रतिभा कायरकर, वैशाली जुपाका, प्रवीण सय्यद, रजनी गेडाम, वैशाली दरवडे, संगीता मेश्राम यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

Gangapur News : १ लाख रुपयांच्या हुंड्यासाठी आणि जामिनाच्या पैशांसाठी विवाहितेचा छळ; चिमुकलीचा ताबा घेत विवाहितेला घरातून हाकलले

Ausa News : ओमराजेंबाबत आदित्य ठाकरेंचा ‘सॉफ्ट कॉर्नर’? बंडखोरी केलेल्या खासदारावर थेट बोलणे टाळले; ‘यायला हवे होते’ एवढेच उत्तर

LPG Cylinder: 1 ऑक्टोबरपासून 'एलपीजी'बाबतच्या नियमांमध्ये मोठे बदल; 'या' ग्राहकांना मिळणार नाही लाभ

Latest Marathi News Live Update : आदित्य ठाकरेंचा शेतात लाइट लावून शेतकऱ्यांशी संवाद

SCROLL FOR NEXT